गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न
गोंदिया -शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली गोंदिया येथे माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर,विनोद हरिणखेडे,वीरेंद्र जायस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
खा.प्रफुल पटेल यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष पदी निवड होणे ही गोंदिया – भंडारा जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे. त्यामुळे श्री पटेल यांच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर गोंदिया येथे प्रथम आगमनानिमित्त भव्य स्वागत करण्याची जबाबदारी आपण सर्वांची आहे. असे समजून त्याची रूपरेषा तयार करण्यासंबंधी चर्चा यावेळी करण्यात आली.
गोंदिया शहराच्या प्रत्येक वार्डातील प्रत्येक बूथवर क्रियाशील लोकांची कमेटी बनवून कमिटीच्या माध्यमातून नवीन लोकांना जोडण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी करावे, गोंदिया शहरातील प्रत्येक वार्डात बूथ कमिटी व संघटन मजबूत करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक जबाबदार व्यक्तींनी करावे यावर चर्चा करण्यात आली.
या बैठकीला सर्वश्री राजेंद्र जैन, गंगाधर परशुरामकर, नरेश माहेश्वरी, विनोद हरिणखेडे, वीरेंद्र जैस्वाल, अशोक सहारे, केतन तुरकर, मनोहर वालदे, श्रीमती माधुरी नाशरे, सुनील भालेराव, सचिन शेंडे, सतीश देशमुख, मालती कापसे, हेमंत पंधरे, राजू एन जैन, नानू मुदलियार, चंद्रकुमार चुटे, वेनेश्वेर पंचबुद्धे, मयूर जडेजा, भगत ठकरानी, दीपक पटेल, मोहन पटले, खालिद पठाण, विनायक खैरे, आनंद ठाकूर, लक्ष्मीचंद रोचवणी, माधवदास खटवाणी, हरिराम आशवाणी, राजेश कापसे, विनायक शर्मा, रमेश कुरील, संदीप पटले, प्रितपाल होरा, सैय्यद इकबाल, विष्णू शर्मा, कुंदा दोनोडे, मामा बनसोड, एकनाथ वाहिले, सौरभ रोकडे, उमेश्वरी चुटे, रमण उके, नागो सरकार, विक्रम बहेलिया, शैलेश वासनिक, राज शुक्ला, लव्ह माटे, विशाल ठाकूर, टी. एम. पटले, दर्पण वानखेडे, झणकलाल ढेकवार, तुषार उके, कपिल बावनथडे, सोनू मोरकर, प्रमोद कोसरकर, रौनक ठाकूर, हर्षवर्धन मेश्राम, दुलीचंद मेश्राम, आकाश मेश्राम, निलेश मेश्राम, गौरव शेंडे, सुरेश दुरुगकर, रिजवान शेख, मंगेश शेंडे, श्रेयश खोब्रागडे, दर्पण मेश्राम, प्रदीप ठवरे, सबिल कुरेशी, जयेश जांभुळकर, लक्षमिकांत डहाट, शरभ मिश्रा, मोनू मेश्राम, अरमान जैस्वाल, मुकेश कनोजिया, कुणाल बावनथडे, तोमीचंद कापसे जी, वामन गेडाम सहित शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.