भाजपला रामराम करीत रमेश ठाकूर यांचा आप मध्ये प्रवेश

0
571

गोंदिया,दि.२९ः तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ कार्यकर्ते रमेश ठाकूर यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोतत आम आदमी पार्टी मध्ये प्रवेश केल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.ठाकूर हे भाजपचे निष्ठावान व संघ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.सटवा ग्रामपंचायतही त्यांच्या हातात असून एैन विधानसभा निवडणुकीपुर्वी भाजप सोडून आम आदमी पक्षात प्रवेश करीत तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे.आपच्यावतीने ठाकूर यांनी या मतदारसंघातून उमेदवारी सुध्दा जाहिर करण्यात आल्याने गोरेगाव तालुक्यातील शहारवाणी जिल्हा परिषद क्षेत्रात भाजपला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.