अर्जुनी मोर.- अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे उमेदवार राजकुमार बडोले यांनी निवडणूक प्रचारार्थ गावागावात पदयात्रा काढून जनसंवाद साधण्यास सुरुवात केली आहे. या पदयात्रेचे गावागावात उत्स्फुतपणे स्वागत केले जात आहे.
दिवाळीनिमित्त राजकुमार बडोले यांनी अर्जुनी मोरगाव शहरात शुक्रवार दिनांक 2 विशेष पदयात्रा आयोजित केली. या पदयात्रेत त्यांनी गावातील नागरिकांशी संवाद साधून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. गावातील वृद्ध महिला युवकांसोबत संवाद साधताना त्यांनी सणासुदीच्या काळात एकत्र येण्याचे आणि सामाजिक एक्के वाढविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. पदयात्रेदरम्यान बडोले यांनी गावातील व परिसरातील समस्या जाणून घेतल्या तसेच त्या समस्या प्राधान्याने मार्गी लावण्याची ग्वाही दिली. अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी आणि उद्योग धंद्याची स्थापना करून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. महायुती सरकारने जनकल्याणाचे अनेक निर्णय घेतले असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात निश्चितच बदल घडुन आला असल्याचे सांगितले.
उपक्रमामधून त्यांनी स्थानिक प्रश्न समजून घेण्याचाही प्रयत्न केला. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष विजय कापगते, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, जिल्हा परिषद चे गटनेते लायकराम भेंडारकर, नगराध्यक्ष मंजुषा बारसागडे, मुकेश जयस्वाल, उद्धव मेहंदळे राकेश जायसवाल, गीता ब्राह्मणकर, भाजपाचे व राष्ट्रवादी अजीत पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते. या उपक्रमा दरम्यान त्यांनी प्रत्येकाला शुभेच्छापत्र आणि मिठाई वाटून सणाच्या आनंदात सहभागी होण्याचा संदेश दिला.बडोले यांच्या उपक्रमाचे स्थानिक नागरिकांनी सुद्धा स्वागत केले.
धानावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाची स्थापना अर्जुनी मोरगाव परिसरात धानावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाची स्थापना करण्यासाठी खासदार प्रफुल पटेल यांच्या मदतीने निश्चितच प्रयत्न करण्यात येतील या परिसराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी व खासदार पटेल यांचे हात अधीक बळकट करण्यासाठी मतरुपी आशीर्वाद सदैव कायम ठेवण्यात यावा.असे आवाहन राजकुमार बडोले यांनी पदयात्रेदरम्यान केले. वन हक्क जमिनीचे पट्टे मिळवून देण्यासाठी लढा अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील वन हक्क जमीन धारकांना कायमस्वरूपी जमिनीचे पट्टे मिळावे यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरवठा केला त्याची दखल घेत राज्यातील महायुती सरकारने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपाययोजना सुरू केल्यात त्यामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे राजकुमार बडोले यांनी सांगितले