शिवसेना(शिंदे)च्या लोकसभा संपर्कप्रमुख पदी माजी आमदार कोरोटे यांची निवड

0
199

देवरी,दि.२६: वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण यांचा प्रचार आणि प्रसार तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करण्या करीता आमगांव-देवरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सहषराम कोरोटे यांची शिवसेना(शिंदे गट)च्या गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राच्या संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.
ही निवड सोमवारी (दि.२४ मार्च) रोजी शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, मुंबई च्या वतीने शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी केली आहे.
कोरोटे यांच्या या निवडी बद्दल गोंदिया जिल्हा प्रमुख सुरेन्द्र नायडू, युवासेनेचे जिल्हा प्रमुख अर्जुनसिंग बैस, जिल्हा समन्वयक डॉ. हिरालाल साठवणे,महिला जिल्हा प्रमुख मायाताई शिवणकर,विधानसभा संघटक बळीराम कोटवार, देवरी तालुका प्रमुख जैपाल प्रधान, युवासेना तालुका प्रमुख अरूण आचले, जिल्हा महिला प्रतिनीधी सिमाताई कोरोटे,ओ.बी.सी जिल्हा संघटक करूणाताई कुर्वे, महिला तालुका प्रमुख आरतीताई जांगळे,वरिष्ठ शिवसैनिक अनिल कुर्वे राजीक खान, गणेश सोनबोईर,शहर महिला प्रमुख सलमाताई पठाण, शिवसैनिक नरेश राऊत, सचिन मेळे कलिराम किरसान आदींनी अभिनंदन केले आहे