■या दिनानिमित्त महाप्रसादाचे वाटप.
—————————-
देवरी,दि.२६-उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने तिथीप्रमाणे गेल्या सोमवारी (दि.१७ मार्च) रोजी शिवसेना पक्ष कार्यालय चिचगड रोड,देवरी येथे रयतेचे राजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती उत्सव देवरी तालुकाप्रमुख सुनील मिश्रा यांच्या नेतृत्वात मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली. या दिनाचे औचित्य साधून एक हजारच्या जवळपास शिवसैनिक व नागरिकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
या जयंती कार्यक्रमाची सुरूवात छत्रपती शिवरायांची मुर्तीपूजन व जय घोषाने करण्यात आली. नंतर एक हजाराच्या जवळपास उपस्थित शिवसैनिक व नागरीकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनाचे जिल्हाप्रमुख शैलेश जायस्वाल हे होते. याप्रसंगी देवरी तालुका प्रमुख सुनील मिश्रा,देवरी शहर प्रमुख राजा भाटिया, उप तालुका प्रमुख सुहाग गिरी, गोंविद बंसोड,दयाल पवार, धर्मेन्द्र जगनीक, डालचंद मडावी,विनोद गौर, किसान सेना तालुका प्रमुख संजय मेहर,विभाग प्रमुख लोकनाथ लांजेवार,प्रशांत यादव, डॉ. भुमेश पटले, वरिष्ठ शिवसैनिक योगेश पवार, शाखा प्रमुख लल्लूप्रसाद उपाध्याय, दिलीप सोनार, आनंद शेंद्रे,अमोल राऊत, हेमराज बावनकुळे, अजय गिरी,मनोहर मेश्राम, खुमराज टेटे, दिनेश डुंभरे, सुभास शाहू,महिला उप संघटीका शामलता पांडे यांच्यासह तालुक्यातील शिवसेना, युवासेना, महिला संघटन, किसान सेना व तसेच समस्त संघटनेचे पदाधिकारी, शिवसैनिक व नागरीक हजारोच्या संख्येत उपस्थित होते.
या सर्वांच्या प्रमुख उपस्थित रयतेचे राजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.