काँग्रेसच्या निरीक्षकांनी घेतला आगामी जि.प.निवडणुकीच्या तयारीचा आढावा

0
17

गडचिरोली : प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा गडचिरोली जिल्ह्याचे निरीक्षक सचिन नाईक यांनी सोमवारी गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची बैठक घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी खासदार डॉ.नामदेव किरसान, आ.रामदास मसराम आणि जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून संघटन मजबूत करण्याच्या अनुषंगाने सूचना केल्या.

निरीक्षक अॅड.सचिन नाईक यांच्यासह इतर पदाधिकारी पुढील काळात जिल्ह्यातील बाराही तालुक्याचा दौरा करून तालुकानिहाय आढावा घेतील. यात आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बूथ मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील असे सांगण्यात आले.

या बैठकीला प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, प्रदेश सचिव रवींद्र दरेकर, अखिल भारतीय काँग्रेस पंचायत राज विभागाचे सचिव अक्षय समर्थ, युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष अॅड.विश्वजित कोवासे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अॅड.कविता मोहरकर, माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडलावार, माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, शहर अध्यक्ष सतीश विधाते, जिल्हा उपाध्यक्ष समशेरखान पठाण, रजनीकांत मोटघरे, हनुमंतू मडावी, नितेश राठोड, प्रभाकर वासेकर, तसेच सर्व तालुक्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.