काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यावर राजकीय सुडबुद्धीने कारवाई

0
74

नागपूर : भाजप सरकार काँग्रेस नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करत आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यावर राजकीय सुडबुद्धीने अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वीही ईडीने सोनिया व राहुल गांधी यांची चौकशी केली आहे. अशाप्रकारे काँग्रेस नेत्यांना नाहक त्रास दिला जात आहे, असा आरोप काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला.

काँग्रेसने दंगलग्रस्त नागपुरात आज काँग्रेसने सद्भावना शांती मार्च काढला. यावेळी ते बोलत होते.ते म्हणाले, भाजपा सरकारच्या विरोधात निर्भिडपणे उभे राहणाऱ्या काँग्रेसच्या देशभरातील नेत्यांवर मोदी सरकार कारवाई करत आहे. काँग्रेस पक्ष ईडी, सीबीआयच्या कारवायांना घाबरत नाही. काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता एकजूट होऊन या कारवाईचा निषेध करेल. जाती धर्माच्या नावावर सुरु असलेला भेदभाव थाबंवण्यासाठी काँग्रेसने सदभावना यात्रा काढली असून अशा सदभावना यात्रा राज्यभर काढल्या गेल्या पाहिजे.नागपूर : भाजप सरकार काँग्रेस नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करत आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यावर राजकीय सुडबुद्धीने अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वीही ईडीने सोनिया व राहुल गांधी यांची चौकशी केली आहे. अशाप्रकारे काँग्रेस नेत्यांना नाहक त्रास दिला जात आहे, असा आरोप काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला.

काँग्रेसने दंगलग्रस्त नागपुरात आज काँग्रेसने सद्भावना शांती मार्च काढला. यावेळी ते बोलत होते.ते म्हणाले, भाजपा सरकारच्या विरोधात निर्भिडपणे उभे राहणाऱ्या काँग्रेसच्या देशभरातील नेत्यांवर मोदी सरकार कारवाई करत आहे. काँग्रेस पक्ष ईडी, सीबीआयच्या कारवायांना घाबरत नाही. काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता एकजूट होऊन या कारवाईचा निषेध करेल. जाती धर्माच्या नावावर सुरु असलेला भेदभाव थाबंवण्यासाठी काँग्रेसने सदभावना यात्रा काढली असून अशा सदभावना यात्रा राज्यभर काढल्या गेल्या पाहिजे.