इंदोरा खुर्दचे सरपंच चौधरी व सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष राऊत यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

0
58

तिरोडा,दि.१७ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुलभाई पटेल यांच्या नेतृत्वावर व विकासात्मक धोरणांवर विश्वास ठेवून तिरोडा तालुक्यातील ग्राम इंदोरा (खुर्द) येथिल कृष्णकुमार चौधरी (सरपंच) व डॉ . शिशुपाल राउत (अध्यक्ष, सेवा सहकारी) यांच्या माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुपट्टा वापरून पक्ष प्रवेश केला.पक्ष संघटन मजबुतीसाठी निश्चितच प्रयत्न करणार असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी प्रामुख्याने माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हा परिषद सदस्य जगदीश बावणथड़े, अखिलेश सेठ, चेतलाल पटले सरपंच बोदलकसा, हरगोविंद चौरसिया, शैलेश वासनिक उपस्थित होते.