सालेकसा,दि.१९ः- सभासद नोंदणी पक्ष मजबूत करण्याची एक पायरी आहे. नोंदणीची प्रक्रिया कार्यकर्त्यांनी बूथ वर किव्हा चावडीवर जाऊन प्रत्यक्ष अंबलबजावणी केल्यास पक्ष मजबूत झाल्या शिवाय राहणार नाही. कार्यकर्त्यांना कोणत्याही अडचणीं आल्यास आमचे नेते खा.प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न आम्ही करीतच असतो. परंतु स्थानिक प्रश्न सोडवून नागरिकांना पक्षाशी जोडणे, पक्षाला बळ देण्याचे व पक्ष वाढविण्याचे काम हे कार्यकर्तेच करीत असतात असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने जिल्ह्यात खा.प्रफुल पटेल यांच्या हस्ते जिल्ह्यात सभासद नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. त्या अनुसंघाने आज सालेकसा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनोहरभाई पटेल महाविद्यालय, सालेकसा येथे सभासद नोंदणीला माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. सभासद नोंदणीचे सफलतापूर्ण आयोजन करून पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी सभासद नोंदणी कार्यक्रम यशस्वी केला.
यावेळी राजेंद्र जैन, प्रभाकर दोनोडे, सुरेश हर्षे, राजलक्ष्मी तुरकर, किशोर तरोणे, केतन तुरकर, अजय उमाटे, बिसराम चरजे, जियालाल पंधरे, गीता चौधरी, संतोष नागपुरे, बाजीराव तरोणे, लक्ष्मण नागपुरे, चंद्रपाल पटले, बबलू मानकर, हिरामण बडोले, जितेंद्र बडोले, उषा वऱ्हाडे, अहमदखान पाठ, महेश दमाहे, भरत नागपुरे, राधेश्याम गंगभोज, फत्तुजी गाते, आदित्य अग्रवाल, बल्लू नागपुरे, प्रल्हाद बनोटे, सुभाष बहेकार, संतोषी चुटे, विलास मरगाये, महेंद्र प्रधान, सीता अवस्थी, प्राची चौधरी, पुष्पा उईके, दुर्गा पटले, सुनीता थेर, दिव्या उके, अमृतलाल लिल्हारे, सुखदास उपराडे, प्रमिलाबाई, सहित मोट्या संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.