विविध मागण्यांना घेवून कांग्रेसचा देवरीत धडक मोर्चा

0
79

देवरी,दि.२०:येत्या मंगळवारला (दि.२२) दुपारी १२ वाजे स्थानिक जिल्हा परिषद ग्राउंड वरून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकांच्या विविध मागण्यांना घेवून धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मोर्चा खासदार डॉ.नामदेव किरसान गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र, डॉ. अभिजीत वंजारी आमदार पदवीधर मतदार संघ नागपूर, गोपाल अग्रवाल माजी आमदार, दिलीप बनसोड माजी आमदार तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष, वंदनाताई काळे अध्यक्ष जिल्हा महिला काँग्रेस गोंदिया, राजकुमार पुराम, जमील भाई खान, संदीप भाटिया जि.प. सदस्य, सुनंदा बहेकार, रंजीत कासम अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस सेवादल तालुकाध्यक्ष, कुलदीप गुप्ता, तसेच सर्व जि.प. सदस्य, प.स. सदस्य, सर्व सरपंच व सदस्य, वरिष्ठ कार्यकर्ता यांच्या नेतृत्वात संयुक्त आघाडीने उपविभागीय देवरी यांच्या कार्यालयावर लोकांच्या विविध मागण्या यात चिचगड ते ककोडी रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे, तालुका अंतर्गत रस्ते बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावे, देवरी चिंचगड मार्गावरील सालई गावाजवळील पूल दुरुस्त करावे, जल जीवन ची खोडंबलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करावे, विद्युत लोड शेडिंग बंद करावे, धनाला प्रति हेक्टरी पंचवीस हजार रुपये बोनस द्यावे, कर्जमाफी करावी, रोजगार हमीचे अकुसल-कुशल मजुरांचे मजुरी तुरंत जमा करावी, अतिक्रमण वरील पट्टे ताबडतोब द्यावे, नगरपंचायत अंतर्गत जास्त असलेला टॅक्स, पाणीकर कमी करावा, नगरपंचायत अंतर्गत शिक्षण कर माफ करावे, घरकुलासाठी पाच ब्रास रेती मोफत मिळावी, पाऊलझोला येथे बीएसएनएलचे टावर तयार करावे, शिरपूर/बांध येथील धरणातील एमआयडीसी अंतर्गत जाणारा पाणी बंद करावे, त्याकरिता वेगळी पाईपलाईन करावी, २३२ केव्ही विद्युत पुरवठा त्वरित करावा, एमआयडीसी अंतर्गत तालुक्यातील बेरोजगार तरुणांना प्रथम प्राधान्य द्यावे, लाडक्या बहिणीला २१००/- प्रति महिना लाभ द्यावा. या मागण्याचा समावेश आहे.
या मागण्यांना घेवून धडक मोर्चाचे आयोजन केले आहे. तरी संयुक्त आघाडीच्या सर्व पक्षातील पदाधिकारी,सदस्य व लोकांनी सदर मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे