चित्रा कापसे
तिरोडा–भारताचा तसाच महाराष्ट्राचा विकास हा काँग्रेस पक्षच घडवू शकतो यावर तसेच नानाभाऊ पटोले व स्थानिक माजी आमदार दिलीप बन्सोड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती वाय टी कटरे यांनी आपल्या 63 समर्थकांसह तिरोडा येथील काँग्रेस भवन येथील आयोजित कार्यक्रमात काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.
यावेळी माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार प्रशांत पडोळे ,माजी आमदार तथा गोंदिया जिल्हा अध्यक्ष दिलीप बन्सोड, काँग्रेस नेते राधेलाल पटले व काँग्रेसचे तालुका व जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते यांच्या उपस्थितीत वाय टी कटरे यांच्या काँग्रेस पक्षात प्रवेश झाल्याने तालुक्यात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य तसेच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे .
वाय टी कटरे यांचे सोबत तु्ंडीलाल शरणागत, वनिता ठाकरे, सुनिता किशोर खंडाते ,साधनाताई डोंगरे, सुनीता मेश्राम, अशोक बिसेन राजू भलावी, विजय वाघाडे, कमलेश मारबते, आशिष वाघाडे, किशोर खंडाते ,शेखर खंडाते, निकलेज खंडाते, शिवा उईके, सुरेश खंडाते, सुनील परतेती ,रवी राऊत, शत्रुघ्न बोबडे, मुकेश खंडाते, सुखराम खंडाते, प्रेमलाल राऊत, मनीषा राऊत, सोनू राऊत, भूमिका मंडारी, सत्यकला कोबडे, कविता परतेती, शारदा खंडाते , जसवंत खंडाते, सुरेखा राऊत, मीरा राऊत ,सिंधू परतेती ,शालू परतेती, लता कोबडे, आकाश कुसराम ,प्रदीप चामलाटे, विनोद चामलाटे ,अनिल राऊत, कन्हैया चामलाटे लघुमन कोंबाडे सत्यवान राऊत ,संदीप चामलाटे, हिरामण टेंभरे, लोकचंद टेंभरे, किशोर टेंभरे जितेंद्र बीसेन, प्रदीप खंडाते ,शेखर खंडाते, अंकुश चामलाटे, सुषमा नेवारे, कांता उडपाते, दुर्गा नेवारे, रूपलाल टेंभरे ,सुरेंद्र ठाकरे, हनीफ शेख, निलेश्वर टेंभरे ,आचल चंद्रिकापुरे, चंद्रप्रकाश सोयाम ,शर्मिला चंद्रिकापुरे ,अरुणा सोयाबीन,शबाना शेख भरत कोबडे यांच्या समावेश आहे.