दागोटोला येथील तंटामुक्ती अध्यक्षासह नागरिकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

0
29

गोंदिया – खासदार प्रफुलभाई पटेल यांचे जनसंपर्क कार्यालय गोंदिया येथे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्राम दागोटोला तालुका गोंदिया येथील तंटामुक्ती अध्यक्ष श्यामलाल मार्बदे, रवींद्र गायधने, बाळकृष्ण गायधने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

खासदार प्रफुलभाई पटेल यांच्या नेतृत्वावर व विकासवादी धोरणांवर विश्वास ठेवून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते संजय शेंडे यांना गोंदिया जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा महासचिव म्हणून नियुक्ती पत्र देण्यात आले. जिल्ह्यात युवकांचे संगटन मजबूत करण्यासाठी सक्रियतेने कार्य करणार अशी ग्वाही देत या नियुक्ती बद्दल शेंडे यांनी खासदार प्रफुलभाई पटेल, माजी आमदार राजेंद्र जैन यांचे आभार मानले.

यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन, गणेश बरडे, केतन तुरकर, राजू एन जैन, नानू मुदलियार, अशोक गौतम, संजय शेंडे, सुनील पटले सहित पदाधिकारी उपस्थित होते.