चंद्रपूर जिल्हा परिषद अध्यक्षांचे आज पदग्रहण

0
13

चंद्रपूर,दि.13ः- जिल्हा परिषदेच्या पुढील अडीच वर्षांसाठी संध्या गुरूनुले यांची निवड अध्यक्षपदी झाली आहे. त्यांनी पदभार सांभाळला आहे. मात्र अद्याप पदग्रहण सोहळा झाला नव्हता.आज १३ जानेवारी रोजी माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत हा पदग्रहण सोहळा होणार आहे. गुरूनुले यांनी अध्यक्षपदी विराजमान होण्याची ही दुसरी वेळ आहे. त्याला सलग पाच वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत हे विशेष.