यवतमाळ,दि.13ः-यवतमाळ जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी आज(दि.13)झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा झेंडाने आपला झेंडा रोवला असून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच शिवसेनेच्या कालिंदा पवार यांची निवड झाली आहे.भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीतून माघार घेतल्याने ही निवड बिनविरोध पार पडली.उपाध्यक्ष पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचे क्रांती उर्फ बाळासाहेब कामारकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.