अर्जुनी-मोर तालुका भाजपाच्या धरणे आंदोलनात शेकडो नागरिकांचा सहभाग

0
171

अर्जुनी-मोर(संतोष रोकडे)दि.25ः- अर्जुनी मोर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने 25 फेब्रुवारीला दुपारी अकरा वाजेपासून तीन वाजेपर्यंत महा विकास आघाडी सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले या धरणे आंदोलनात शेकडो नागरिक सहभागी झाले होते प्रमुख वक्त्यांच्या शासन विरोधी वक्तव्यानंतर तहसील कार्यालय अर्जुनी-मोर च्या प्रांगणात नायब तहसीलदार  गेडाम यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की सध्याच्या महा विकास आघाडी सरकारने दोन लाख रुपये कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती परंतु अंमलबजावणी करण्यात आली नाही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन त्यांची कर्जापोटी पेड केलेली रक्कम त्यांच्या खात्यात जमा करावी तसेच राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत महिलांना जाळून टाकणं विनयभंग करणे अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणे त्यामुळे महिला व तरुण मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अशा घटना घडू नये यासाठी कठोर उपाययोजना करावी व घडलेल्या घटनांतील दोषींवर कार्यवाही करावी खरीप हंगाम 2019 20 या कालावधीत पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम त्वरित देण्यात यावी खरीप हंगाम 2019 20 या कालावधीत शेतकऱ्यांना शासनाने धानाला जाहिर केलेले बोनस त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे शासकीय धान्य खरेदी केंद्रावरील विक्री केलेल्या धानाचे चुकारे त्वरित द्यावे शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज देयके माफ करण्यात यावे तसेच डिमांड भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना त्वरित विद्युत पुरवठा करण्यात यावा वनजमिनीचे पट्टे अतिक्रमणधारकांना देण्यासाठी प्रकरणे त्वरित निकाली काढावे भाजपा सरकारच्या काळातील सुरू असलेली इतर असंगठित कामगारांसाठी इमारत बांधकाम व कामगार कल्याण नोंदणी योजना सध्याच्या विकास आघाडी सरकारने बंद केली आहे ती सुरू करावी रमाई आवास योजना वसरी आवास योजना यांना प्रपत्र ड प्रमाणे घरकुलांचा लाभ देणे सुरू आहे याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने इतर प्रवर्गातील प्रपत्र ड प्रमाणे घरकुलांचा लाभ योजना सुरू करावी भाजपा सरकारने घरकुल बांधकामाकरिता लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती मोफत पुरवठा करण्याची योजना सुरु केली होती ती ती योजना विकास आघाडी सरकारने बंद केली ती सुरू करावी संपूर्ण केसरी रेशन कार्ड धारकांना स्वस्त धान्य दुकानातून शिधा पुरवठा करण्यात यावा तसेच नागझिरा वनगाव बांध व्याघ्र प्रकल्पाचे तसेच वन लगतच्या शेतकऱ्यांचे वन्य प्राण्यांपासून शेत पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे यासाठी वनविभागाकडून शेत पिकांचे संरक्षण करण्याकरिता काटेरी कोणकोणती योजना राबविण्यात यावी तसेच नुकसान भरपाई देण्यात यावी अशा मागण्यांचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना अर्जुनी मोर्चे तहसीलदार यांच्या मार्फत देण्यात आले
याप्रसंगी अर्जुनी-मोर भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अरविंद शिवणकर,उमाकांत ढेंगे,महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा रचना गहाणे,जिल्हा महामंत्री लायकराम भेंडारकर,डॉ.गजानन डोंगरवार, नाजूक कुंभरे, जि.प.सदस्य मंदाताई कुमरे,होमराज ठाकरे,मीना शहारे,पोमेस रामटेके,रामदास कोहाडकर,रघुनाथ लांजेवार,मंजुषा तरोने,दामोदर नाकाडे,देवेंद्र टेंभरे,गिताबाई ब्राह्मणकर ठाकरे या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणांतून सध्याच्या महाविकास आघाडी सरकारवर चौफेर टीका केली.सभेचे संचालन रत्नाकर बोरकर तर प्रास्ताविक प्रकाश गहाणे तर आभार प्रदीप मस्के यांनी केले