महाआघाडी सरकारच्या विरोधात भाजपने केले धरणे आंदोलन

- उपविभागीय अधिकाèयांना निवेदन सादर

0
224

गोंदिया,दि.२५ फेब्रुवारी : राज्यातील शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी सरकारकडून शेतकèयांची फसवणूक आणि महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांचा निषेध करीत भारतीय जनता पार्टी गोंदिया शहर व ग्रामीण मंडळातर्फे आज, २५ फेब्रुवारी रोजी येथील नवीन प्रशासकीय इमारतीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन उपविभागीय अधिकाèयांना देण्यात आले. आंदोलनात खा. सुनील मेंढे, माजी आमदार गोपालदास अग्रवाल, माजी जि. प. अध्यक्ष नेतराम कटरे, शहर अध्यक्ष सुनील केलनका, ग्रामीण मंडळ कार्यकारी अध्यक्ष नंदकुमार बिसेन यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले.
या वेळी खा. मेंढे म्हणाले की, भाजपच्या मागील सरकारने जे चांगले निर्णय घेतले होते, ते निर्णय व योजना बंद करण्याचा घाट महाविकास आघाडीने घातला आहे. शेतकèयांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन हवेतच विरले असून गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे सांगून सरकारचा निषेध केला. माजी आ. अग्रवाल  म्हणाले की, महाआघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर शेतकèयांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन तर सोडाच  अवकाळीग्रस्त शेतकèयांना दिलेल्या वचनाप्रमाणे हेक्टरी २५ हजार रुपये मदत दिली नाही आणि फसवी कर्जमाफी जाहीर करुन शेतकèयांची दिशाभूल केली. या राज्य सरकारने समाजाच्या प्रत्येक घटकाची फसवणूक केली असून हे रिमोटवर चालणारे सरकार आहे. कुठल्याही निर्णयात त्यांची एकवाक्यता नाही. बेजबाबदार व विश्वासघातकी या सरकारच्या काळात गुन्हेगारांना धाक न उरल्याने महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. हे त्वरित थांबले नाही तर उग्र आंदोलन करू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. धरणे आंदोलनात खा. मेंढे, माजी जिप अध्यक्ष कटरे, नंदकुमार बिसेन, संजय कुलकर्णी, भरत क्षत्रिय, दीपक कदम, संजय टेंभरे, जिप सदस्य छायाताई दसरे, डॉ प्रशांत कटरे, जयंत शुक्ला, नरेंद्र तुरकर, शंभशरणसिंह ठाकूर, गजेंद्र फुंडे, सतीश मेश्राम, अर्जुन नागपुरे आदींनी आपल्या संबोधनातून राज्य सरकारच्या धोरणावर घणाघात प्रहार केला. या वेळी प्रामुख्याने संतोष चौहान, गणेश हेमने, श्यामलाल ठाकरे, शिव शर्मा, भावना कदम, बंटी पंचबुद्धे, हेमलता पतेह, दिलीप गोपलानी, अशोक हरिणखेडे, अमित झा, प्रकाश रहमतकर, कौशल तुरकर, अशोक पाठक, अशोक चौधरी, गोल्डी गावंडे, मनोज मेंढे, देवचंद नागपुरे, संजय मुरकुटे, राजेश बिसेन, बाबा बिसेन, योगराज रहांगडाले, रामू शरणागत, कुलदीप रिनायत, वजीर बिसेन, चिंतामण चौधरी, अशोक जयसिंघानी, विनोद चांदवाणी, महेश चौरे, अजय गौर, पारस पुरोहित, अजित मेश्राम, धनंजय वैद्य, जयपाल मेश्राम, चंद्रभान तरोने, मुजीब पठाण, कुणाल बिसेन, बबली ठाकूर, देवेंद्र अग्रवाल, दिपम देशमुख, आनंदराव तुरकर, धर्मेंद्र डोहरे, महेंद्र पुरोहित, गुड्डू लिल्हारे, पंकज भिवगडे, अशोक मेंढे, राजकुमार खंडेलवाल, योगेंद्र सोलंकी, राकेश लांजेवार, कुवरलाल ठाकरे, प्रीतलाल बघेले, भोजराज पटले आदी कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.