सडक अर्जुनी,दि.27– राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या कार्यक्रमासह विविध उपक्रमांचा आढावा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष मेहबुबभाई शेख यांच्या अध्यक्षतेखाली कार्याध्यक्ष रविकांत वर्फे यांच्या उपस्थितीत(दि.२६)कोहमारा येथील एरिया ५१ आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात घेण्यात आला.यावेळी प्रामुख्याने गोंदिया युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किशोरभाऊ तरोणे, भंडारा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ,सडक/अर्जुनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रजनीताई गिरिपुंजे,मंजुषाताई चंद्रिकापुरे,सडक /अर्जुनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आशिष येरणे व अर्जुनी/मोर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निपल बरैया उपस्थित होते.