32 सिकलिस्ट नी गोल्ड मेडल पटकाविला…
अमरावती सायकलिंग असोसिएशन द्वारे घेण्यात आला सायकलिंग चॅलेंज….
गोंदिया :– अमरावती सायकलिंग असोसिएशन द्वारे 1 महिन्याचा सायकलिंग चॅलेंज घेण्यात आला होता. या मध्ये 280 लोकांनी सहभाग घेतला या सायकलिंग चॅलेंज मध्ये दर दिवशी 40 किलोमीटर सायकल चालवायचे होते. यामध्ये गोंदिया येथील 39 लोकांनी या सायकलिंग चॅलेंज मध्ये सहभाग घेतला.यापैकी 32 सिकलिस्टनी गोल्ड मेडल पटकाविला आहे. हे संपूर्ण चॅलेंज 1 महिनाचे असून या मध्ये 1 महिन्यामध्ये 25 दिवस तरी सायाकल चालवणे अनिवार्य होते. तर यामध्ये 280 लोकांनी सायकल चालवून हा सायकलिंग चॅलेंज पूर्ण केला. तर 280 सिकलिस्ट पैकी गोंदिया तील 3 सिकलिस्ट रहाले टॉप 3 मध्ये ज्यामध्ये पहिल्या क्रमांकावर निखिल बहेकार, दुसऱ्या क्रमांकावर उदयभान निर्वाण तर तिसऱ्या क्रमांकावर आशा तिडके.त्याचप्रमाणे या सगळ्यांना अमरावती येथे अमरावती सायकलिंग असोसिएशन द्वारा गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तर गोंदिया येथे सुद्धा लवकरच सायकलींग संडे ग्रुप द्वारा सायकलिंग चॅलेंज घेण्यात येणार आहे. तर अमरावती सायकलिंग असोसिएशनची औपचारिक नोंदणी तीन वर्षांपूर्वी झाली होती.मात्र त्यांनी सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे प्रयत्न गेल्या ७-८ वर्षांपासून सुरू आहेत. लोकांनी सायकलींगकडे कसे वळणार त्यासाठी त्यांनी सायकलींग रंगोत्सव सुरू केले. ज्या मध्ये सायकलिंग चॅलेंज ठेवण्यात येते. तर या वर्षी सुध्दा त्यांनी सायकलिंग चॅलेंज ठेवले होते.त्यामध्ये २८० सायकलस्वार सहभाग घेतला होता. ज्यामध्ये गोंदियातील सर्वाधिक ४० सायकलस्वारांनी नोंदणी केली होती. या सायकलिंग चॅलेंज अध्ये एकूण 280 सायकलस्वारांनी सहभाग घेतला व त्यांनी आपला लक्ष्य यशस्वीरित्या साध्य केले आणि पदके मिळवली.