मुंबईतील पर्यटकांचा ताडोबा बफर क्षेत्रात अपघात;जंगली डुकराला धडक, दोन गंभीर

0
55

चिमुर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रात जंगल सफारी करण्यासाठी मुंबईहून आलेल्या पर्यटकांच्या गाडीसमोर अचानक जंगली डुक्कर आल्याने त्या डुक्कराला वाचविण्याच्या प्रयत्नात चार चाकी वाहनावरून चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात मुंबईतील चार पर्यटक जखमी झाल्याची घटना शनिवार दि.१९ एप्रिलला सकाळी ६ वाजताच्या सुमारास (Tadoba Tourists accident) ताडोबा बफर झोन क्षेत्रातील गोंडमोहाळी फाट्याजवळ घडली.

एका खासगी रिसोर्ट वरून मुंबई येथील पर्यटक,स्वतः आपल्या चारचाकी वाहन क्रमांक, एमएच ४८ – ०५६६ या चारचाकी वाहनाने शिरकाळा बफर जंगल सफारी साठी जात होते. (Tadoba Tourists accident) यात योगेश कमलिया (३३) मुंबई,दीक्षा जया शेट्टी ( ३४) धीरज हेगडे (३२) नमिता छाभरा (३४ ) हे सर्व मुबंई येथील आहेत.

पर्यटक आपल्या चारचाकी वाहनाने सफारी करण्यासाठी निघाले असता जंगली डुकराला जोरदार धडक बसल्याने अपघात झाला यात पर्यटक किरकोळ जखमी झाले आहेत. एकाच्या हाताला गंभीर मार आहे. या (Tadoba Tourists accident) जखमीना उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे भरती करण्यात आले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्या जातं आहे. धडक एवढी जोरदार होती की त्या धडकेत जंगली डुक्कर जागेवरच ठार झाला.