UPSC 2024 मध्ये दीपस्तंभ मनोबलच्या १७ विद्यार्थ्यांचे घवघवीत यश – त्यात ७ दिव्यांगांचा समावेश!

0
305

*मनू गर्ग प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये भारतात प्रथम!*

नवी दिल्ली--केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर झालेला असून, यात दीपस्तंभ फाउंडेशन च्या मनोबल प्रकल्पातील विविध वर्गांमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या १७ विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत यश मिळवले असून, विशेष म्हणजे १७ विद्यार्थ्यांपैकी ७ विद्यार्थी दिव्यांग आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांमद्धे मनू गर्ग(AIR91), रवी राज(AIR182), प्रणव कुलकर्णी(AIR 256), पुष्पराज खोत(AIR304), श्रीरंग काओरे(AIR396), बिरदेव डोणे(AIR551), रोहन पिंगळे(AIR581), वेदान्त पाटील(AIR601), ओंकार खुंटाळे(AIR673), अभिजीत अहेर(AIR734), श्रीतेश पटेल(AIR746), तुषार मेंदापारा(AIR), हर्षिता मेहनोत(AIR766), संपदा वांगे(AIR839), मोहन(AIR984), मयंक भारद्वाज(AIR985), संकेत शिंगाटे(AIR479) यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना आनंद पाटील (IAS),वैभव निंबाळकर (IPS),सागर डोईफोडे(IAS),धिरज मोरे(IRS), पूजा कदम (IRS), मिलिंद पाटील (विभागप्रमुख, दीपस्तंभ) यांच्याबरोबर ४० अधिकाऱ्यांच्या टीम ने मार्गदर्शन केले आहे अशी माहिती मनोबल चे प्राध्यापक अमोल लंके यांनी दिली.
संस्थापक यजुर्वेन्द्र महाजन सर यांनी सांगितले की,“दिव्यांग विद्यार्थ्यांनी दाखवलेली जिद्द आणि चिकाटी प्रेरणादायी आहे. त्यांच्या यशामुळे संपूर्ण समाजाला नवी दिशा मिळेल. मनोबल प्रकल्पाचा खरा उद्देशच अशा क्षणांना आकार देणं हाच आहे.”
यशस्वी विद्यार्थ्यांपैकी मनू गर्ग (AIR 91) यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले:
“मी २०२१ पासून दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल प्रकल्पाशी जोडलेलो आहे. दृष्टीदिव्यांग विद्यार्थ्यांसाठी येथे उपलब्ध असलेले अ‍ॅक्सेसेबल स्टडी मटेरियल, वैयक्तिक मार्गदर्शन, आणि सतत प्रेरणा देणारं अभ्यासपूरक वातावरण—यामुळे UPSC परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर मला योग्य दिशा आणि आत्मविश्वास मिळाला. माझ्या या यशाच्या प्रवासात दीपस्तंभ मनोबलने दिलेल्या अमूल्य योगदानासाठी मी मनःपूर्वक आभार मानतो.” – मनू गर्ग