जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला करणाऱ्या नराधमांचा खरा चेहरा उघड;चार दहशतवाद्यांचा फोटो आला समोर

0
133

नवी दिल्ली:-जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला होता. मंगळवारी घडलेल्या या भ्याड हल्ल्याने संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. चार ते पाच दहशतवाद्यांनी दुपारच्या सुमारास पहलगाम येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात 26 पर्यटकांनी आपले प्राण गमावले आहेत. या हल्लेखोरांचा AK-47 रायफल्ससह उभे असतानाचा फोटो आता समोर आला आहे. हा फोटो हल्ल्यापुर्वीचा असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून हा कट रचला जात होता. पाकिस्तानातून हे हल्लेखोर त्या ठिकाणी आले होते, त्या ठिकाणी असलेल्या स्लीपर सेलच्या मदतीने या हल्लेखोरांनी हल्ले केले. यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. दहशतवाद्यांचा चेहरा दिसणारा हा पहिला फोटो समोर आला आहे. काश्मिरमधील नागरिकांनी देखील या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. हल्लेखोरांचा हा फोटो समोर आल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांपैकी दोघा स्थानिक दहशतवाद्यांची नावं आदिल गुरी आणि आसिफ शेख असल्याची माहिती मिळाली आहे. या दोघांसोबत आणखी दोन पाकिस्तानी दहशतवादी होते. पहलगाममध्ये काल झालेल्या या तर या हल्ल्याची जबाबदारी लष्कर ए तोयबाशी संबंधित द रेझिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती. सुरक्षा यंत्रणांकडून दहशतवाद्यांचे स्केच जारी करण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांचा फोटो समोर आला आहे. हा भ्याड हल्ला करण्यापूर्वीचा हा दहशतवाद्यांचा फोटो असल्याचे म्हटले जात आहे.