मुल्ला विज वितरण केंद्रासह सबस्टेशनवर धडकला संतप्त नागरिकांचा मशाल मोर्चा

0
137

जाहिरातबाजीचे स्टंट करणाऱ्या लोकप्रतिनिधी विरोधात धगधगला संतप्त नागरिकांचा आक्रोश

देवरी,दि.२४- गेल्या अनेक महिन्यापासून आमगाव येथील १३२ केव्हीए सबस्टेशन मधील रोहित्रामध्ये बिघाड झाल्याने मुल्ला सबस्टेशनमधून होणारे वीजवितरण अनियंत्रित झाले. मनमर्जी लोडशेडींगच्या नावाखाली नागरिकांचा महावितरणने छळ मांडला. परिणामी, शेतकऱ्यांचे अनियंत्रित भारनियमनामुळे शेतातील पीक जाण्याच्या मार्गावर आले. नागरिकांचे उकाड्यामुळे हाल झाले तर लहान कुटीर उद्योग डबघाईला आले. विकासाचे पोकळ वासे फिरवित रोहित्र आणल्याचे भासवत केवळ स्टंटबाजी करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या जखमांवर केवळ मीठ चोळण्याचे काम केले. यामुळे नागरिकांच्या सहनशिलतेचा अखेर अंत झाला. निवदने, विनवण्या आदींना प्रतिसाद न मिळाल्याने अखेर आज रात्री सुमारे आठच्या सुमारास मुल्ला वीजवितरण केद्राच्या अखत्यारित येणाऱ्या गावातील वीजग्राहकांचा मशाल मोर्चा विजवितरण केंद्रासह सबस्टेशनवर धडकला. (सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)