चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यावर सध्या सूर्य आग ओकत आहे. चंद्रपूर व ब्रम्हपुरी ही दोन शहरे सर्वाधिक उष्ण शहर म्हणून नोंदविली जात असतांना आज शुक्रवारला ब्रम्हपुरीचे तापमान ४५.५ अंश सेल्सीअस इतके नोंदविले असून सलग दुसर्या दिवशी देखील ब्रम्हपुरीचे (Bramhapuri) तापमान उच्चांकावर आहे. काल गुरुवारी दि.२४ एप्रिलला चंद्रपूरचे तापमान ४५ अंशावर पोहचले.मात्र चंद्रपूरला मागे टाकीत चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहरात काल सर्वाधिक ४५.९ अंश सेल्सिअस इतके विक्रमी तापमान नोंदविले होते तर आज शुक्रवारी देखील देशात ब्रह्मपुरीचे तापमान सर्वाधिक असल्याचे नोंदविल्या गेले आहे तर चंद्रपूरचे तापमान ४५.४ अंश सेल्सीअस नोंद करण्यात आले आहे. मागील तीन दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात सूर्य आग ओकत आहे. त्यामुळे दुपारच्या सुमारास शहरातील रस्ते सुनसान निर्मनुष्य होते. एप्रिल महिन्यातच चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी उष्णतेने त्रस्त झाले आहेत.