अर्जुनी मोरगाव,–कोरोना या जागतिक महामारीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देशात शासनाचे वतीने लसीकरण मोहीम सुरू आहे. कोरोना ला हरविण्यासाठी सुरक्षितते सोबत लसीकरण हा महत्वपूर्ण उपाय आहे.शहरी भागात लसीकरण अभियानास उत्तम प्रतिसाद मिळत आहे.मात्र ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये या विषयी गैरसमज निर्माण झाले आहेत. यामुळे लसीकरण मोहिमेचे उद्दिष्ट साध्य होण्यास बाधा येत आहे.सम्पूर्ण लसीकरनाशिवाय कोरोणावर विजय प्राप्त करणे शक्य नाही.यासाठी शासन युद्धस्तरावर लसीकरणमोहीम राबवित आहे.तालुक्यात लसीकरनाला उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.काही अपवादात्मक गावे वगळता उर्वरित ठिकाणी लसीकरण माहिती सुरळीतपणे सुरू आहे. तालुक्यातील भरनोली, कनाडगाव,इडदा या गावांमध्ये नागरिकांनी लसीकरण मोहिमेबद्दल धास्ती घेतली होती. विविध प्रकारच्या अफवांमुळे या परिसरात लसीकरण मोहिमेला अडथळा निर्माण झाला होता. गावातील नागरिकामधे लसीकरणा बद्दल गैरसमज होते. प्रशासनास नागरिकांचा गैरसमज दूर करून या ठिकाणी लसीकरण मोहीम फत्ते करणे हे क्रमप्राप्त होते.याच उद्देशाने शुक्रवार 21 मे ला उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांच्या नेतृत्वाखाली या गावांना भेटी दिल्या गेल्या.प्रशासनाच्या या प्रयत्नानंतर सदर गावांमध्ये लसीकरणा सुरुवात झाली. यावेळी तहसीलदार विनोद मेश्राम,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय राऊत, खंडविकास अधिकारी राठोड, ठाणेदार, वैद्यकीय अधिकारी डॉ. पिंकू मंडल,स्थानिक आशा वर्कर्स, गावातील सरपंच उपस्थित होते.सर्व उपस्थितांनी ग्रामस्थांची समजूत काढली, लसीकरणा बद्दल सर्वांना प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. नागरिकांनी प्रशासनाचे यावेळी आभार व्यक्त केले