अर्जुनी मोरगाव-गेल्या अनेक दिवसापासून हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू होणार की नाही याबद्दल शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांच्या सततच्या पाठपुराव्याने अखेर गोंदिया जिल्हा मध्ये धान खरेदी केंद्रांना सुरुवात झाली.
तालुक्यातील दि लक्ष्मी सहकारी धान गिरनी अर्जुनी/मोरच्या खरेदी केंद्राची सुरवात आज झाली.कृषि उत्पन्न बाजार समितिच्या गोडाऊन मध्ये या धान खरेदी केन्द्राचे उदघाटन अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहरराव चंद्रिकापूरे यांच्या हस्ते करण्यात आले.
मील मालकांनी धान खरेदी केंद्र सुरु करने,धानाची उचल करने ,धानाची भरडाई करने, गोडाऊन ची व्यवस्था करने व मीलिंग या बाबीवर चंद्रिकापुरे यांनी उपस्थितांची चर्चा केली.
यावेळी कृषि उत्पन्न बाजार समिति चे मुख्यप्रशासक लोकपाल गहाणे,गिरिश पालीवाल,बंशीधर लंजे, उद्धव मेहेंदले,माजी जि.प. सदस्य किशोर तरोने,रतीराम राणे, लक्ष्मी सहकारी संस्थेच्या अध्यक्षा कांता पाऊलझगडे, उपाध्यक्ष राकेश लंजे , विजयसिंह राठोड,प्रमोद लांजेवार,राईसमिल संघटनेचे अशोक चांडक,लुनकरन चितलांगे,सर्वेश भूतडा, महेंद्र पालिवाल, हेमंत भांडारकर,ललित बालबुद्धे ,पप्पू भैया ,विष्णु भैया, श्याम चांडक, सोमेश्वर सोंदरकर, तालुका युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष योगेश नाकाडे, यशवंत गणवीर, लैलेश शिवणकर व शेतकरी उपस्थित होते. तालुक्यातील हमीभाव केंद्र सुरू झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंद असून त्यांनी खासदार प्रफुल्ल पटेल आणि आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे आभार व्यक्त केले आहे