नुकसानग्रस्तांची मौका चौकशी करून लाभ द्या : जिप सदस्य किरण पारधी

0
17

तिरोडा, दि.7 : मागील काही दिवसांपासून अतिवृष्टीसम पाऊस पडत आहे. त्यातच 5 जुलै रोजी अनेकांची घरे पडले. काहींच्या घरात पाणी घुसले, अन्नधान्याचे नुकसान झाले. त्यांची मौका चौकशी करण्यात यावी. तसेच त्यांना दुरुस्तीसाठी पैसे देण्यात यावे. त्यांना घरकुल योजनेचा प्रथम लाभ देण्यात यावे. जिप कवलेवाडा क्षेत्रातील प्रत्येक गावात जावून अतिवृष्टी झाल्यामुळे लाभ देण्यात यावे. असे प्रतिपादन जिप सदस्य किरणकुमार पारधी यांनी केले..याप्रसंगी जिप सदस्य किरण पारधी यांच्यासह पंस सदस्य पिंटू चौधरी (जितेंद्र), पुजारीटोलाचे सरपंच अनिल मरसकोल्हे, तलाठी नागदेवते, पुजारीटोला येथील धनराज बोबडे, अजाब भोयर, भुमेश्वर पारधी, विजय राणे, उमेश बोबडे, व्यंकट महादुरकर, मोतीराम बावणकर, मोरेश्वर येरखडे, कवलेवाडा येथील मुलचंद तूरकर, छोटेलाल तूरकर, प्रभू पारधी नत्थूटोली उपस्थित होते.

लाभ

पुजारीटोला येथे आकस्मिक भेट

ग्रामपंचायत पुजारीटोला येथे सरपंच अनिल मरसकोल्हे, सचिव व रोजगार सेवक यांना भेट देण्यात आले. गावातील विविध विकासकामे, मनरेगातून जास्तीत जास्त कामे करावी, मी समृद्ध तर गाव समृद्ध ही संकल्पना साकार करावी, असे जिप सदस्य किरणकुमार पारधी यांनी सांगितले. तसेच गावामध्ये स्वच्छताविषयक कामांचा आढावा घेण्यात आला.याप्रसंगी पंस सदस्य जितेंद्र चौधरी, सरपंच अनिल मरसकोल्हे, सचिव, रोजगार सेवक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत.तसेच या वेळी शाळा, अंगणवाडी, रस्ते, स्वच्छ पाणी, घरकुल, आरोग्य, शौचालय, शिक्षण, महिला बचत गट यावर चर्चा करण्यात आली.