पार्किंग प्लाझाचे लोकार्पण तरीही नागरिकांना वाहनतळाची प्रतीक्षाच

0
22

गोंदिया,दि.07ः वाहतुक कोंडी नियंत्रणात रहावी, जनतेच्या वाहनांना सुरक्षित वाहनतळ उपलब्ध व्हावे यासाठी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी तब्बल 6 कोटी रुपये खर्ची घालून अत्याधनिक सोयी सुविधायुक्त पार्किंग प्लाझा हे वाहन तळ उभारण्यात आले. गत महिन्यात त्याचे मोठ्या थाटामाटात लोकार्पण ही करण्यात आले. मात्र अद्याापही वाहनतळाचे संचालन न झााल्याने शहराच्या मुख्य बाजारपेठेत वाहतुक कोंडीचे चित्र पहावयास मिळते.शहर जिल्ह्याचे ठिकाण व मुख्य बाजारपेठ आहे. येथे रोज हजारो वाहनांची प्रचंड वर्दळ असते.नवनिर्मित पार्किंग प्लाझा लाकार्पणानंतरही सामान्य जनतेसाठी उपलब्ध झाला नसल्याने जागे अभावी वाहनधारक जागा मिळेत तेथे वाहने उभी करतात. यामुळे वारंवार
वाहतुक विस्कळीत होते.सुरक्षेअभावी अनेकांची वाहने चोरीला गेल्याच्या घटनाही उघडकीस येत आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठेतील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी,वाहतुकीची कोंडी होऊ नये व वाहनधारकांना सुरक्षीत ठिकाणी वाहन ठेवण्याची सुविधा व्हावी,यासाठी तत्कालीन आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या प्रयत्नाने शहरात पार्किंग प्लाझा या वाहनतळाला मंजुरी मिळाली.यावर तब्बल 6 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
नगर परिषदेतर्फे पार्किंग प्लाझा तयार करण्यात आला. गत महिन्यात 12 तारखेला आवश्यक सुविधेशिवाय राजकीय
दबावात पार्किंग प्लाझाचे लोकप्रतिनिधी,अधिकारी, पुढारी यांच्या उपस्थित लोकार्पण करण्यात आले. तीन आठवडे लोटल्यानंतरही नगर परिषदेच्या गलथान कारभारामुळे पार्किंग प्लाझा वाहनतळ निरुपयोगी ठरतो आहे. परिणामी बाजारपेठेतील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.
वाहनधारक दुकान वा मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी करीत असल्याने नेहमीच वाहतुकीची कोंडी पहायला मिळते.प्रसंगी रस्त्यावर उभ्या वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यताही बळावलेली आहे.पार्किंग प्लाझाचे लोकार्पण होऊन तो सामान्य जनतेसाठी सुरू करण्यात आलेला नाही.सोयी,सुविधा तत्काळ उपलब्ध करून पार्किंग प्लाझा जनतेसाठी उपलब्ध करून द्यावा, अन्यथा या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा शहर भाजपच्या शिष्टमंडळाने 5 जुलै रोजी मुख्यााधिकारी करण चव्हाण यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदन देतेवेते वेळी जिल्हा भाजप उपाध्यक्ष अशोकसिंह चौधरी,माजी नप सभापती शकील मंसुरी,श्वेता पुरोहित,भागवत मेश्राम,व्यंकट पाथरू,मनोज पटनायक,अंकीत जैन,प्रवीण अग्रवाल, राहुल शर्मा,पुरणलाल पाथोडे,असित अग्रवाल यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.