अर्जुनी-मोरगाव : शहरात नगरपंचायतमार्फत विकासकामांना गती मिळत आहे. नगरातील 17 प्रभाग चक्क आणि लखलखीत होण्यासाठी पहिल्या टप्प्यात सहा प्रभागांमध्ये 12 हायमास्टचे लोकार्पण करण्यात आले. नगराध्यक्षा मंजुषा बारसागडे यांच्या हस्ते हायमास्टचे लोकार्पण झाले.
या वेळी सभापती दाणेश साखरे, संजय पवार आणि नगरसेवक उपस्थित होते. नुकतेच शहरात पाच कोटी निधी अंतर्गत टूमदार रस्ते, भूमिगत गटारे यांचे भूमिपूजन नुकतेच पार पडले. मूलभूत सुविधांच्या प्रगतीपथावर नगरपंचायतची वाटचाल सुरू आहे. चौदाव्या वित्त आयोगातून 12 हायमास्ट तर दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना आणि दलितेत्तर योजनाअंतर्गत उर्वरित 11 प्रभागांमध्ये 21 हायमास्ट लागणार आहेत. 70 लक्ष रुपयाचे निधीतून शहरात लखलखाट होणार आहे.