मालवी शाळेतील अंगणवाडीतील विद्यार्थ्यांकरिता कुलर भेट

0
20
तुमसर:नगर परिषद शाळेचे व त्यातील अंगणवाडीचे चे नाव काढले तर, अनेकांच्या कपाळावर आठ्या पडू लागतात. दिवसेंदिवस इंग्रजी शाळांची संख्या वाढत आहे, परिणामी नगर परिषद शाळा व अंगणवाडी तुमसर शहरांतील पालकही पाठ फिरवू लागले आहेत, परंतु ज्या शाळेमुळे आपण घडलो, तिचे काहीतरी देणे लागते, ही जाणीव ठेऊन तुमसर येथील नगर परिषद मालवी शाळा येथे तुमसर येथील सदैव शिक्षणासाठी, विद्यार्थ्यांच्या हितासाठी मदतीचा हात देणारे समाजसेवक यासीन छवारे व राजमुद्रा ग्रुप संस्थापक अध्यक्ष इंजि. सागर गभने यांनी पुढाकार  घेत अंगणवाडी ला कुलर भेट दिले.
विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये कारण की वातावरणामुळे नागरिकांच्या प्रकृतीवर प्रभाव पडतोय त्यामुळे विद्यार्थ्यांच्या तब्येतीवर परिणाम होऊ नये कारण गर्मी चे प्रकोप वाढताना दिसत आहे अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही या उद्देशाने यासीन छवारे, इंजी. सागर गभने यांनी पुढाकार घेत  हा उपक्रम राबवला. एकिकडे इंग्रजी शाळांची वाढलेली संख्या पाहता पालकांचा ओढा इंग्रजी शाळांकडे दिसून येतो. त्यामुळे नगर परिषद शाळांकडे  व अंगणवाडी कडे विद्यार्थ्यांसह पालकांनी पाठ फिरवल्याचे चित्र पहायला मिळत असतानाच अंगणवाडीतील लहान मुला-मुलींची सोय व्यवस्थित होत असली तर संख्या कायम राहील म्हणून कुलर भेटवस्तू म्हणून देण्यात आले.
                    यावेळी यासीन छवारे यांनी सांगितले की परिस्थिती माणसाला खूप काही शिकवन देते आणि परिस्थितीच्या अभावामुळेच मी शिक्षणात थोडा मागे राहलो.परंतु भविष्यात गरजू विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या भविष्य उज्वल करण्यासाठी मी सदैव अग्रेसर राहील असे सांगितले.
                  व इंजि.सागर गभने यांनी सांगितले की आमचे शिक्षण सुद्धा नगरपरिषदेच्या शाळेत झाले होते.त्यावेळी सुद्धा सोयींच्या अभावा राहायचा व त्याकडे सर्व दुर्लक्ष करत होते.जो त्रास आम्ही त्यावेळी सहन केला, व विविध सोयींचा अभाव अनुभऊन आम्ही उच्च शिक्षण घेऊन आज ईथवर पोहोचलेलो आहोत. त्यामुळे प्राथमिक शिक्षण हे मुलांच्या भविष्याचा पाया आहे आणि जर पाया मजबूत असला प्रत्येक विद्यार्थी याच्याशी उंच शिखर गाठेल अशा विश्वास दाखवत पुढेही जिथे जिथे मदत करण्याची परिस्थिती निर्माण होईल आम्ही पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांच्या हितासाठी समोर येऊ असे इंजि. सागर गभने यांनी सांगितले यावेळी मुकेश मालेवार, रींकु ठाकुर, प्रवीन भुरे, नानु परमार, हितेश मेहर, अनुप तिडके,अवि पटले उपस्थित होते