गोंदिया-जिल्ह्यातील शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आलेले धान जिल्ह्यातील राईसमिलमध्येच मिलींग करावयाचे असताना सालेकसा तालुक्यातून छ्तीसगड राज्यात हमीभावात खरेदी केलेले धान भरडाईकरीता ट्रक क्रमांक सीजी 08 एए 6641,सीजी 08 झेड 8832 ने जात असताना सालेकसा तहसिलदारांच्या पथकाने शुक्रवार(दि.5)ला पकडून पोलिसांच्या स्वाधिन केले होते.ते ट्रक आज शनिवारला ट्रकचालकांच्या बयाणाच्या विपरीत राईस मिलर्सनी जिल्हा पणन अधिकारी यांना दिलेल्या बयाणाच्या आधारावर पोलीस ठाण्यातून सोडण्यात आले.यामुळे याप्रकरणात सखोल चौकशीची गरज निर्माण झालेली आहे. ट्रकचालकानी धान छत्तीसगडला घेऊन चालल्याचे सांगितल्याची माहिती सालेकसाचे तहसिलदार नरसैय्या कोंडगुर्ले यांनी दिली.
दरम्यान सालेकास पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक बाळासाहेब बोरसे यांना विचारणा केली असता काल ट्रक जमा करण्यात आले होते,मात्र आज शनिवारला प्रशासनाच्या निर्देशानुसार सोडण्यात आल्याचे सांगितले.
सालेकसा तालुक्यातील एका शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आलेला धान उचल करुन तांदुळ तयार करण्याकरीता जिल्हा पणन अधिकारी गोंदिया यांनी सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा येथील राईस मिलच्या नावे डीओ आदेश दिले.तो डीओ आदेश घेऊन ट्रकचालक त्या धान खरेदी केंद्रावर पोचल्यानंतर संबधित संस्थेने डीओनुसार त्या ट्रकला धान दिले.ते धान घेऊन सदर ट्रक हे सड़क अर्जुनी तालुक्यातील शेंडा येथील राईस मिलमध्ये न जाता ते छत्तीसगडच्या दिशेने ट्रक सीजी 08 एए 6641,सीजी 08 झेड 8832 हे जात असताना सालेकसा औद्योगीक प्रशिक्षण संस्थेजवळ पकडण्यात आले होते. सालेकसा तहिसलदार यांनी सदर ट्रक थांबवून विचारपूस केल्यावर सदर धान शासकीय केंद्रातून छत्तीसगड येथे नेले जात असल्याचे ट्रकचालकाने सांगितले.त्यानुसार तहसिलदारांनी सदर ट्रकचालकांना ट्रक सालेकसा पोलीस ठाण्यात जमा करण्यास सांगितले.
तर जिल्हा पणन अधिकारी इंगळे यांना विचारणा केली असता त्यांनी सदर धान हे शासकीय धान खरेदी केंद्रावरीलच होते असे सांगितले.तसेच राईस मिलमालकांनी चुकीने ट्रक चालक छत्तीसगडच्या दिशेने झाल्याचे लेखी निवेदनात सांगितल्याचे म्हणाले. मग छत्तीसगडच्या दिशेने जाणारे ट्रक अचानक कसे सोडण्यात आले,प्रश्न उपस्थित झाला असून असा प्रकार सालेकसा,आमगावसारख्या सीमावर्ती तालुक्यात मोठ्याप्रमाणात होत असावा यास दुजोरा मिळाला आहे.