गोंदिया :-तालुक्यातील चंगेरा येथे संगम महिला ग्राम संघातर्फे वार्षिक सर्वसाधारण आमसभा गाव संघाच्या अध्यक्षा सविताताई बिजेवार यांच्या अध्यक्षतेखाली शादी खाना हॉल येथे पार पडली.यावेळी सरपंच लालसिंग पंधरे,ग्रामविकास अधिकारी एच.पी. गजभिये,झाकीर खान,बबीताताई देवधारी(सीएलएफ लेखापाल), मिराताई शिवांशी,फुंडे मॅडम (कृषी सहाय्यक),मंजुलता मॅडम (अंगणवाडी सेविका)व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होते.प्रास्ताविक साहिना मिर्झा यांनी केले.सीएलएफ लेखापाल बबिता देवधारी यांनी महिलांना व्ही.आर.एफ.C.I.F. कर्ज वाटप व व्यवसाय निर्मितीच्या माध्यमातून रोजगार या विषयावर मार्गदर्शन केले.पल्लवी ग्रुपच्या अध्यक्षा सोफिया खान यांनी व्यवहार विषयावर माहिती सादर केली. फुंडे मॅडम यांनी बीज प्रक्रिया या विषयावर मार्गदर्शन केले.ग्रामसंघाच्या लेखापाल नौशीन खान
यांनी नोव्हेंबर 2018 ते मार्च 2023 र्च पर्यंतचा अहवाल सादर केला.
60,000/- गट आणि गॅबी शाह गटाला.सूक्ष्म निधीचा धनादेश देऊन गौरव करण्यात आला.पल्लवी गट व सत्यम गटाचा ग्रामसंघामार्फत उत्कृष्ट महिला गट म्हणून पारितोषिक वितरण करून सत्कार करण्यात आला.यावेळी महिलांसाठी कबड्डी, संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.व्यवस्थापक नूरजहाँ खान यांनी उपस्थित सर्व महिला आणि पाहुण्यांचे आभार मानले.