आदिवासी गोवारी समाजाचे एक दिवसीय धरणे आंदोलन आज

0
16

गोंदिया : आदिवासी गोवारी समाज संघटनांच्या समन्वयक व कृती समितीच्या वतीने प्रलंबित मागण्या व समस्यांना घेवून ५ जून रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यानुरून विदर्भातील सर्व जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असून शासन धोरणाचा निषेध नोंदविण्यात येणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार खर्‍या गोंडगोवारी जमातीतील अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करणे तसेच त्यांना अनुसूचित जमातीचे सर्व लाभ देणे, १४ ऑगस्ट २०१८ च्या जीआर मध्ये नमुद गोंडगोवारी जमातीला निर्गमित करण्यात आलेले जात प्रमाणपत्र व त्याना अनुसूचित जमातीचा लाभ देणे आदि विविध समस्या व मागण्यांना घेवून आदिवासी गोवारी समाज संघटन महाराष्ट्रच्या नेतृत्वात समन्वय व कृती समितीतर्पेâ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ५ जून रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येत समाज बांधवांनी सहभाग व्हावे, असे आवाहन आदिवासी गोंडगोवारी (गोवारी) संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.