वाशिम, दि. 05 : जिल्हयात आपत्कालीन परिस्थिती उदभवल्यास तातडीने उपाययोजना करण्यासाठी विविध विभाग प्रमुख, पोलीस, गृहरक्षक आणि नगर पालिकेच्या अग्नीशमन कर्मचाऱ्यांचा समावेश करुन जिल्हास्तरीय शोध व बचाव पथक गठीत करण्यात आले आहे. सन 2023-24 या वर्षात निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी या पथकाची निर्मिती करण्यात आली आहे.
जिल्हास्तरीय शोध व बचाव पथकाचे पथक प्रमुख निवासी उपजिल्हाधिकरी नितीन चव्हाण (8898981818) हे आहेत. उपपथक प्रमुख राखीव पोलीस निरीक्षक किसन राठोड (9579367636), जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार (9822660284), जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे (9423434308), सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्यंकट मिठ्ठेवाड (9422872937), वाशिम पाटबंधारे मंडळाचे कार्यकारी अभियंता शामकांत बोके (7588500716), लघु पाटबंधारे विभाग क्र. 3 चे कार्यकारी अभियंता व्ही. बी. सानप (9890926868), महावितरणचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम चव्हाण (7875763281), मृद व जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी सुभाष आकोसकर (9922667099), कारंजा लघु पाटबंधारे क्र. 2 चे कार्यकारी अभियंता विरेंद्र चौधरी, जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी लक्ष्मण मापारी (9422103813), जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. धर्मपाल खेळकर (9764383822), जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष कोरे (9422626602), जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी हरण (7038660899), जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. किशोर लोणकर (9823301245), जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे आरोग्य सहाय्यक राजेंद्र घुगे (9764270965), जिल्हाधिकारी कार्यालयाचे सहाय्यक अधिक्षक के.के. देवळे (9922897277), जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत (9049589693), छत्रपती बहुउद्देशिय तरुण मित्र मंडळ स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी गजानन मेसरे (9423651307), कारंजा (लाड) येथील सर्वधर्म आपत्कालीन स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी श्याम सवाई (9371871584), बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथील मानव सेवा सामाजिक विकास कार्य व आपत्ती व्यवस्थापन बहुउद्देशिय फाऊंडेशनचे प्रतिनिधी दिपक सदाफळे (9822229471) व मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा येथील साळूंकाबाई राऊत कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाचे समन्वयक प्रा. बी.एस. डोंगरे (7709579390) यांचा या पथकामध्ये समावेश करण्यात आले आहे. तसेच पोलीस अधिक्षक कार्यालय, जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय, नगर परिषद, वाशिम कार्यालयातील निवडक कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.