गोंदिया,दि.25ः नाशिक येथे अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद राष्ट्रीय अध्यक्ष लक्की जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी बैठकीत अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद विदर्भ युवा अध्यक्ष पदी प्रा. संतोष आत्राम तर विदर्भ कार्याध्यक्ष पदी शुभम चिंतामण आत्राम यांची नियुक्ती करण्यात आली.या बैठकीला निरज चव्हाण (राष्ट्रीय युवा महानिरीक्षक),अनिल राऊत राष्ट्रीय सोशल मीडिया प्रमुख,गणेश गवळी (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष),आकाश मडावी (महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष),प्रदेश महासचिव दारासिंग पावरा,प्रदेश सल्लागार निलीप गावीत, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रामा पथवे, कोकण विभाग अध्यक्ष मालू निरगुडे,उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अशोक जाखेरे उपस्थित होत.
राज्यातील आदिवासींना संघटीत करून गाव तेथे परिषद घर तेथे परिषद वाढविण्यासाठी सूचना देऊन आदिवासींच्या समस्या सोडविण्यासाठी सतत काम करा. पद हे लोकांच्या हितासाठी त्यांच्या समस्या सोडवून त्यांना न्याय देण्यासाठी असतात.आपल्या क्रांतिकारकानी घडवलेला रक्त रंजित इतिहास डोळ्यासमोर ठेवून त्यांचे विचार, प्रेरणा घेऊन कामाला सुरुवात करा असे राष्ट्रीय अध्यक्ष लक्की जाधव यांनी विचार व्यक्त केले.
यावेळी प्रामुख्याने धीरज सुरत्ने (विदर्भ उपाध्यक्ष),अमन बोरे (विदर्भ सहसचिव),वीरेंद्रकुमार ऊईके (विदर्भ महानिरीक्षक),अतुल कोडापे जिल्हाध्यक्ष (चंद्रपूर),साहिल मडावी जिल्हाध्यक्ष (गोंदिया),कुणाल कोवे जिल्हाध्यक्ष (गडचिरोली ),गणेश बालवंशी (नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष), सतिश पोर्टेटी (तालुकाध्यक्ष मुलचेरा,गडचिरोली )मयूर कोवे ,सागर इवनातें व महाराष्ट्रातील परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.