मतमोजणीकरीता नियुक्त कर्मचारी व अधिकाऱ्यांनी  जबाबदारीने कामे करावी

0
49

– जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी

भंडारा, दि.24: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024- 11 भंडारा-गोंदिया मतदार संघाचे मतदान दिनांक 19 मार्च 2024 रोजी पार पडले असून मतमोजणी दिनांक 4 जून 2024 रोजी पलाडी येथे होणार आहे.

या 4 जून 2024 रोजी होणाऱ्या मतमोजणीकरीता जिल्ह्यातील नियुक्त कर्मचारी व अधिकाऱ्यांना आज जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रशिक्षण देण्यात आले.

मतमोजणीकरीता नियुक्त कर्मचारी व अधिकाऱ्यांनी जबाबदारीने कामे करावी, असे निर्देश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी उपस्थित कर्मचारी व अधिकाऱ्यांना मतमोजणी बाबत सविस्तर माहिती देण्यात आली तसेच त्यांच्या शंकांचे निराकरण यावेळी उपजिल्हाधिकारी श्रीमती लीना फलके व जिल्हा नियोजन अधिकारी शशिकुमार बोरकर यांनी केले.