पांढरीत सौर उर्जा योजनेची पाण्याची टाकी कोसळून फुटली

0
61

गोंदिया,दि.२४ः- सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथे काही दिवसा पूर्वी जल जीवन मिशन अंतर्गत सोलर पाणी पुरवठा योजना गावात तयार करण्यात आली.त्या योजनेंतर्गत दोन वेगवेगळ्या ठिकाणी सोलर पंप बसवून पाण्याकरीता प्लास्टिकची टाकी लावण्यात आली.मात्र योजनेच्या कामात गुणवत्ता नसल्याने या नित्कृष्ठ कामाची पोलखोल लावण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीने केली आहे.योजनेचे काम होऊन काही दिवस लोटत नाही तोच ९-१० लाख रुपये खर्च झालेल्या निधीतील पाणी भरलेली टाकी खाली कोसळून फुटल्याने कंत्राटदाराने नित्कृष्ठ साहित्याचा वापर सौरउर्जेवरील पाणी योजनेत केल्याचा आरोप गावातील नागरिकांनी केला आहे.योजनेच्या ठिकाणी दिनांक २३/०५/२०२४ ला सायंकाळी ८-९ वाजेच्यां सुमारास पाण्याने भरलेली टाकी आपोआप फुटून खाली कोसळली. यापूर्वी सुध्दा अशीच घटना घडली होती,तरीही प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नसल्याचे नागरिकांचे म्हणने आहे.