ग्राम पंचायत संगणक परिचालकांच्या समस्या आगामी अधिवेशनात मांडणार- आम. कोरोटे

0
112

ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेचे आमदार सहसराम कोरोटे यांना निवेदन

देवरी,दि.२६ आमगाव -देवरी विधानसभा क्षेत्रासह संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटना यांच्या समस्या आगामी विधान सभेच्या अधिवेशनात मांडणार असल्याची माहिती आमदार सहसराम कोरोटे यांनी आज रविवार (ता.२६ मे) रोजी ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदना प्रसंगी बोलताना दिली.
आमदार कोरोटे यांना सादर केलेल्या निवेदनात ग्रामपंचायत संगणक परिचालक यांनी आकृतीबंधातात सामाविष्ट करून शासनाने दिलेली मानधन वाढ करण्याचे आश्वासन पूर्ण करण्यात यावे,महाराष्ट्र राज्यामध्ये संगणक परिचालक हे ग्रामपंचायतीमध्ये ग्रामीण भागातील संपूर्ण माहिती पोहचविण्याचे काम करतात. गावातील प्रत्येक नागरिकांचा संबंध ग्रामपंचायत संगणक परिचालकांसोबत येतो. आज ग्रामपंचायत मधून एका वर्षाचा चेक दिला जातो. पण ग्रामपंचायत मधील संगणक परिचालकांना ६- ६ महिने मानधन दिले जात नाही. ६ हजार ९३० रुपये मानधन वेळेवर मिळत नसेल तर काम करणा-या संगणक परिचालकांची मानसिकता कां होईल? तसेच या बद्दल आपण विचार करावा व आम्हाला वेळेवर मानधन मिळण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
आम्ही आमच्या मागण्यासाठी शासनस्तरावर भरपूर आंदोलन केले. मोर्चा ते आमरण उपोषण केल्यानंतर शासनाने संगणक परिचालक यांच्या जीवाशी खेळून मरणाच्या वाटेवर गेल्यावर शासनाने ३ ते ५ हजार मानधन वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. जानेवारी २०२४ पासून मानधन वाढ करु असे मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी शब्द दिला असल्यामुळे आमरण उपोषण मागे घेतला होता. पण आज जानेवारी २०२४ जावून मे २०२४  सुद्धा संपत आहे, तरी शासनाद्वारे मानधन वाढ झाल्याचे समजून येत नाही. तरी आपण आमचा मानधनवाढी बदल तत्काळ संबंधित विभागासोबत बोलून आम्हाला न्याय देण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती संघटनेच्या वतीने करण्यात आली.
ग्रामपंचायत संगणक परिचालक हे गेल्या २०११ पासून ग्रामपंचायतीमध्ये काम करीत असून त्यांची शासनामार्फत कंत्राट आणून मानसिक व आर्थिक पळवणूक होत आहे. ग्रामपंचायत संगणक परिचालकांचा मानधन १२ हजार २५२ रुपये असून संगणक परिचालक यांना फक्त ६ हजार ९३० मिळतात. काही संगणक परिचालक यांना १ हजार ५००,२ हजार,२ हजार ५०० असा मानधन दिला जातो.
शासन स्तरावर आकृतीबंध सुधारित करण्याची प्रक्रिया सुरु असून त्यामध्ये ग्रामपंचायत संगणक परिचालक यांना घेण्यात यावे, यासाठी आपण शासन स्तरावर बोलून आमच्या अधिकार मिळवून द्यावे, अशा आशयाचे निवेदन सादर केले.
या निवेदनावर आमगावं -देवरी विधानसभेचे आमदार सहषराम कोरोटे यांनी ग्रा.पं.संगणक परिचालक कर्मचारी यांच्या समस्या येत्या अधिवेशन शनात मांडणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी बोलताना दिली आहे.