गोंदिया,दि.१३ः-येत्या पाच वर्षापर्यंत कुठल्याही शेतकर्याला कृषी पंपाचे विज बिल भरायचे नसून उपसा सिंचन योजनेला सुध्दा त्याकरीता आम्ही आधीच निधी दिला आहे.धानाचा बोनस यावर्षी सुध्दा देणार असून यावर्षी २५ हजार रुपयाचा बोनस देण्याची फाईल मुख्यमंत्र्याकडून मंजूर करवून घेतो अशी घोषणा केली.
धापेवाडा योजनेच्या टप्पा २ व ३ चे भुमिपूजन आणि दुरुस्त झालेल्या वितरिकेचे लोकार्पण आज करण्यात आले असून ७५ हजार हेक्टर जमीन शेतजमिन सिंचनाखाली येणार असून तिरोड्याचे आमदार विजय रहागंडाले हे आमदारच नव्हे तर पाणीदार आमदार असल्याची ग्वाही दिली.आपल्या सरकारने सिंचनाला महत्वा दिले असून शेतकर्यांचा विकास हाच आमच्या पक्षाचा मुलमंत्र असल्याचे सांगत भाजपच्या काळातच विदर्भातील सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले.काँग्रेसकाळात विदर्भातील सिंचनाच्या प्रकल्पाला निधीच मिळत नव्हता,त्यामुळे सिंचनाचे प्रश्न आम्हाला सोडवण्याची संंधी मिळाल्याचे राज्याचे उपमुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ते तिरोडा येथे धापेवाडा टप्पा २ व तिरोडा नगरपरिषदेतील भुयारी गटर योजना आणि इतर कामाच्या भुमिपूजन प्रसंगी उदघाटक म्हणून बोलत होते.कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,आमदार विजय रहागंडाले,आमदार डाॅ.परिणय फुके,माजी आमदार राजेंद्र जैन,हेमंत पटले,खोमेश्वर रहागंडाले,भजनदास वैद्य,जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहागंडाले,जिल्हा परिषद सभापती संजय टेंभरे,बाजार समितीचे सभापती पिंटू रहागंडाले,भाजयुमो जिल्हाध्यक्ष ओम कटरे,जिल्हा परिषद व पंचायत सदस्य,भाजप,राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी पुढे बोलतांना उपमुख्यंत्री फडणवीस म्हणाले की,१ कोटी लखपती दिदी करायचा निर्धार आम्हाला करायचा असून मोदीजीनी दिलेला मंत्र आपल्याला जपायचे असल्याचे म्हणाले.आपल्या लाडक्या बहिण योजनेविरुध्द काँग्रेसचे लोक न्यायालयात गेले की ही योजना फसवी आहे,तर नाना पटोले,उध्दव ठाकरे व पवारसाहेब ही योजना आपली सरकार आल्यावर बंद करु असे म्हणत आहेत.परंतु ज्यांच्यासोबत लाडक्या बहिणी आहेत त्यांचीच सरकार पुन्हा येणार असल्याने त्यांचे स्वप्न हे असेच राहणार असल्याची टिका केली.
यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की,सर्वाधिक निधी आपल्या मतदारसंघाच्या विकासाकरीता आणणारे आमदार विजय रहागंडाले असून महाराष्ट्रातील पहिल्या २५ आमदारांमध्ये यांचा समावेश असल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले.मुलगा अविष्कारची आठवण करीत त्या दुःखातही आपल्या सेवेसाठी पक्षाचा व मतदारसंघाचा काम विजयने केला,असा आमदार आपल्याला भेटणे शक्य नसल्याचे विचार व्यक्त करीत शेतकरी,लाडक्या बहिणी,युवकांच्या हितासाठी आमचा पक्ष काम करीत असल्याची ग्वाही दिली.तसेच येत्या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांची जमानत जप्त करीत भाजपचा कमळ फुलवण्याचे आवाहन केले.
प्रास्तविकात आमदार विजय रंहागडाले यांनी धापेवाडा टप्पा २ व ३ चे भुमिपूजनासह जलपूजन करण्यात येत असल्याचे सांगत चोरखमारा व बोदलकसा कालव्याचे लोकार्पण करण्यात येत असल्याचे सांगत ५२१७ कोटी रुपयाच्या निधीचे सर्वात मोठे भूमिपूजन होत आहे.पांगडी,कटंगीजलाशयाच्या कालव्यांची दुरुस्ती होणार आहे.खळबंदा जलाशयाच्या कालव्याची दुरुस्ती न झाल्याने पाणी जात नाही.त्याकरीता १०० कोटीच्या कामाचे प्रस्ताव आहेत,त्यांना मंंजुरी देण्याची मागणी केली.
यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन यांनी धापेवाडा सिंचन योजनेची सुरवात प्रफुलभाई पटेल व अजितदादांच्या नेतृत्वात सुरु झाले,त्या योजनेला आता देवेंद्रभाऊच्या माध्यमातून पुढे नेले जात असल्याचे सांगत ही योजना कधीच बंद होऊ शकत नसल्याचे सांगितले.धान उत्पादक शेतकर्याना गेल्या वर्षी २० हजाराचे बोनस दिले होते,यावर्षी ५ हजाराची वाढ करुन २५ हजार करण्यात यावे,तसेच दिवाळीपुर्वी धान खरेदी केंद्र सुरु करण्यात यावे अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मांडली.
आमदार परिणय फुके यांनी तिरोडा मतदारसंघात विजय रहागंडालेनी विकासाची गंंगा आणली असून राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून विकासाकडे वाटचाल केल्याचेही म्हणाले.२०१४ ते १९ पर्यंत राज्यात एकाही शेतकर्याची वीज कापली गेली नाही असे सांगत आता विज बिल माफ केल्याचे म्हणाले.संचालन माजी जि.प.उपाध्यक्ष मदन पटले यांनी केले.