इटखेडा येथे बलिप्रतिपदा ‘महासम्राट बळीराजाचे’ पूजन करून अभिवादन

0
302

अर्जुनी मोरगाव,दि.०३ः-“इडापिडा टळो… बळीराज्य येवो…” म्हणुन सुमारे 3000 वर्षापासुन समस्त भारतीय ज्याच्या पुनरागमनाची प्रतीक्षा करीत आहेत, असा सिंधु, कृषी सभ्यतेचा महानायक, कुळस्वामी, समतावादी, प्रजाहितदक्ष, स्वामी तिन्ही जगाचा, महादानशूर, महाबली, महासम्राट, “माझी प्रजा,अन्नदाता सुखी भव: ” म्हणुन सतत काळजी घेणारा, जीवलग, इतका जीवलग की सात काळजाच्या आत कायम जपून ठेवावा, असा हा आमचा बळीराजा.
दिवाळीला इटखेडा येथील बाजार चौकात उद्धव मेहेंदळे यांचे हस्ते प्रतिमा पूजन , मातीच्या बैलाचे, गोधनाचे पूजन, व ईतर सांस्कृतिक कार्यक्रम करून बळीराजा महोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी उद्धव मेहेंदळे, छबील बुराडे,तुकाराम मडावी, सुभाष देशमुख ,रतिराम सुंदरकर, तुलांरामझिलपे ,वासुदेव गोटे ,पांडुरंग गोटे ,अर्णव मेहंदळे, एकनाथ सोनवणे ,वासुदेव अनवले, पांडुरंग गोटे, श्रावण सुंदरकर, हेमंत मीसार, धनीराम भोयर, सुभाष मेश्राम, विश्वनाथ मळावी ,दिगंबर मिसर गोवर्धन ढोरे, विजय ठाकरे, देवराम दूपारे,जनार्दन मेश्राम, नीलकंठ उईके,संजय मैंद, लीलाधर अनवले, दत्तु गोठे,बळीराम मडावी, जयपाल मडावी , सेवक प्रधान, विलास मैंद, भीमराव मेश्राम, भास्कर गोठे, सतिश चांदेवार तसेच मोठ्या संख्येत महिला,बालक, आबालवृद्ध उपस्थित होते.