गोंदिया : दिवाळी सणाच्या दुसर्या दिवशी गोवर्धन पुजनाची परंपरा आहे. शेकडो वर्षांची परंपरा आदिवासी गोंडगोवारी समाजाच्या वतीन जपण्यात येत आहे. (ता.२) गोवर्धन पुजन कार्यक्रम होता. त्यानुसार आदिवासी गोंड-गोवारी समाज संघटनेच्या वतीने आदिवासी गोंड गोवारी समाज संघटना गोंदिया जिल्हाध्यक्ष सुशील राऊत यांच्या नेतृत्वात संजय नगर, रामनगर, सेंद्रीटोला, तुमखेडा, कटंगी, पांढराबोडी, फुलचूर, काटी, कामठा, अर्जुनी आदि ठिकाणी कार्यक्रम साजरा करण्यात आला. आदिवासी गोवारी समाज बांधवांनी पारंपरित पध्दतीने कार्यक्रम आयोजित करून गायगोधन पुजन केले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अध्यक्ष सुशील राऊत, संजू कुशराम, सुनील राऊत, दीपक नेवार, नितिन आंबेडारे, बबन नेवार, सुनील भोयर, विशाल नेवार, विकास नेवारे, सूरज नेवारे, मारुति नेवारे, संतोष शहारे, सुनील सोनवाने, नानु चचाने, वसंत नेवारे, गोविंद वाघाडे आदिंसह गावातील इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आदिवासी गोवारी समाजाच्या वतीने आदि अनादी काळापासून परंपरा पाळली जात आहे. आदिवासी संस्कृती, डार जागणी, ढाल पुजन, गायगोधन, गाव नाचणी करून दिवाळी सण साजरा केला. ही परंपरा पिढ्यानपिढ्या पासून सुरू आहे. या अंतर्गत संजय नगर, रामनगर, सेंद्रीटोला, तुमखेडा, कटंगी, पांढराबोडी, फुलचूर, काटी, कामठा, अर्जुनी येथील आखरावर गोवर्धन पुजनाचे कार्यक्रम २ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते. मोठ्या उत्साहात ढाल पुजन करून गोवर्धन पुजा साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला गोवारी समाजाचे नागरिकांसह परिसरातील महिला-पुरूषांची उपस्थित होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदिवासी गोंड-गोवारी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.