गोंदिया, दि.5 : 64-तिरोडा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निरीक्षक (सामान्य) सुनिल कुमार यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था तिरोडा येथील स्ट्राँग रुमला भेट देऊन पाहणी केली व आवश्यक त्या सूचना उपस्थितांना दिल्या. यावेळी निवडणूक निरीक्षकांचे संपर्क अधिकारी निलेश कानवडे, तहसीलदार गोरेगाव प्रज्ञा भोकरे, नायब तहसीलदार राजश्री मलेवार, नायब तहसीलदार जयंत सोनवाने व नोडल अधिकारी पंकज जिभकाटे उपस्थित होते.