कोहका-भानपूर मार्गावर वाघाचा मृत्यू

0
639

गोंदिया,दि.१४- गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातंर्गत येत असलेल्या गोंदिया वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत कोहका-भानपूर मार्गावर वाघाचा मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. ही माहिती मिळताच वनखात्याचे पथक घटनास्थळी पोहोचले.टी-14 वाघिणींचा 20 महिने झालेला वाघ असल्याचे वृ्त्त आहे.

नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्राबाहेरचे हे क्षेत्र आहे. ज्याठिकाणी वाघाचा मृत्यू झाला, तो वाघांचा कॉरिडॉर आहे. वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अजून स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, वनखात्याचे पथक व स्वयंसेवी घटनास्थळी पोहोचले असून ते वाघाच्या मृत्यूमागील नेमक्या कारणांचा शोध घेत आहेत. दरम्यान, १४ दिवसातील हा सहाव्या वाघाचा मृत्यू आहे.