पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांना निवेदन सादर करून केली मागणी
अर्जुनी-मोर.– गोंदिया जिल्ह्याचे नंदनवन असलेला व नैसर्गिकसौंदर्य लाभलेल्या राष्ट्रीय उद्यान नवेगाव बांधचे गतवैभव प्राप्त करण्यासाठी माजी मंत्री व या क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांनी प्रयत्न सुरू केले आहे. नवेगाव बांध पर्यटन संकुल परिसराचा विकास आराखडा मंजूर करून 50 कोटी रुपये सौंदर्यकरणासाठी देण्यात यावे अशी मागणी करून आमदार बडोले यांनी राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांना मंत्रालयातील दालनात निवेदन दिले. व त्यांचे सोबत विविध विकासात्मक कार्यावर चर्चा केली.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानाचे पर्यटन संकुल परिसर तिनहजा एकर( बाराशे हे. आर ) अशा विस्तीर्ण जलाशय या परिसरात असून याला लगतच्या महसूल विभागाच्या पाचशे एकर परिसरात नवेगाव बांध नावांनी नावाजलेले पर्यटन संकुल विस्तारीत आहे. सदर संकुल 40 वर्षांपूर्वी अस्तित्वात आले असून व या ठिकाणी पर्यावरणाची हानी न करता निसर्ग पूरक पर्यटनाचा आराखडा डीपीआर तयार करून व सदर कामे त्वरित सुरू करण्यात यावी. त्याकरिता 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी आमदार राजकुमार बडोले यांनी पर्यटनमंत्र्याकडे केली आहे. या विकास आराखड्यामध्ये नवेगाव बांध पर्यटन स्थळी नवनिर्मित गार्डन, वैभव गार्डन, मनोहर गार्डन, हॉलिडे होम गार्डन ,यांचे नव्याने निर्माण कार्य करण्यात यावे ,बालोद्यानाचे जिर्णोद्वार करणे, जलाशयात जल पर्यटन, वॉटर स्पोर्ट, नौका विहाराची व्यवस्था सी प्लेनसी रायडिंग करणे, संजय कुटी परिसराचे सुशोभिकरण व पॅराग्लायडिंग स्काय टाॅवर मेडिटेशन हाल तयार करणे, हिलटॉप व मनोहर गार्डन चे नवीनीकरण व संगीत फवाऱ्याची व्यवस्था करणे, थायलंडच्या धरतीवर एक ते पाच मधील प्राणी वगळून इतर प्राण्यांचे संग्रहालय पुन्हा सुरू करण्यात यावे ,थायलंड प्रमाणे म्युझियम तयार करणे ,संकुल परिसर ते संजय कुटी अडीच किलोमीटर मिनी ट्रेन सुरू करण्यात यावी, तलावाचे खोलीकरण करून मातीचे ढिगारेद्वारा तलावात उंचवटे तयार करून पक्षांचे आश्रयस्थान निर्माण करणे, बसस्थानक नवेगाव बांध ते संकुल परिसर मार्गाच्या दुतर्फा शोभिवंत (पाम ट्री)झाडांची लागवड करणे, पर्यटन संकुल परिसरात इंटरप्रिटेशन हाल केंद्र तयार करणे, तलावातील मध्यभागी असलेल्या मालडोंगरी बेटाचे सुशोभीकरण करणे, राष्ट्रीय उद्यान व व्याघ्र प्रकल्पातील सफारी करिता पर्यटकांच्या सोयीकरिता रस्त्यांची दुरुस्ती करणे, नवेगाव बांध पर्यटक संकुल परिसराचे मुख्य प्रवेशद्वार भव्य दिव्य व सुशोभित करणे, पर्यटन व रोजगार यांचा विचार करून पर्यटन उद्योगास चालना मिळेल असे पर्याय व उपाय योजवावेत, राज्य शासनाने राज्यस्तरीय निविदाद्वारे सफर पर्यटन संकुलाचे बीओटी तत्त्वावर प्राधान्य क्रमाने विचार करावा, या सर्व कामांकरिता नवेगाव बांध परिसराचा विकास आराखडा तयार करण्याकरिता ५० कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी ही आमदार राजकुमार बडोले यांनी पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे लावून धरली आहे.