मुकाअ  एम.मुरुगानथंम यांची अतिदुर्गम,जंगलव्याप्त प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगावला भेट

0
84

अर्जुनी मोरगाव,दि.२१ः-तालुक्यातील प्रतापगड यात्रेच्या नियोजनाची सभा आटोपल्यानंतर अतिदुर्गम व जंगलव्याप्त प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगाव येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानथंम यांनी  आकस्मिक भेट देवुन आरोग्य संस्थेत देत असलेल्या आरोग्य सेवा व सुविधाची पाहणी केली.
भेटी दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रातील आतील व बाहेरील परिसराची स्वच्छता,बाह्यरुग्ण सेवा (ओपीडी) दरम्यानच्या वेळेत मिळत असलेल्या रुग्ण सुविधा, क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे नियमित गावनिहाय भेटीचे नियोजन,पर्यवेक्षांनी उपकेंद्रांना भेटी, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा आढावा,औषधी साठा,शासकिय निवास्थान ई.विविध बाबींचा आढावा घेवुन मुख्यालय राहणे,रुग्णसुविधा गुणवत्तापुर्वक देणे,सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे करण्यात यावी,कर्मचारी यांनी कर्तव्यस्थानी ओळखपत्र व ड्रेस कोड नियमांचे काटेकोरपणे पालन करावे,आरोग्य संस्थाचे रेकॉर्ड अद्यावत करुन मुख्यालयी राहण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या. आरोग्य संस्थेतील कर्मचार्यांचे शासकीय निवास्थानाची पाहणी केली. शेवटी प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी यांनी महाशिवरात्री पर्व दि. 26 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत होणार्या प्रतापगड यात्रे दरम्यान उत्तम नियोजन करुन भाविकांना आरोग्याच्या सोयी,मुबलक औषधी साठा,रुग्णवाहीका सुरळीत ठेवण्याच्या सुचना दिल्या.
भेटि दरम्यान त्यांचे सोबत जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.निरजंन अग्रवाल, अर्जुनी मोरगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुकन्या कांबळे यांचे सह प्राथमिक आरोग्य केंद्र गोठ्णगावचे वैद्यकिय अधिकारी डॉ.स्नेहल गायकवाड,डॉ.स्नेहा कापगते,फार्मासिस्ट मुकुल बडवाईक,आरोग्य सहायिका अर्चना मेंढे,स्टाफ़ ब्रदर चिरायु वावरे ,लँब सहाय्यक प्रिती म्हसके,भुमेश्वरी भोयर,प्रतिक्षा धांडे,परिचर अरविंद उके,प्रभु उके,कुमुद शहारे,उषा बागडे, फुलचंद चौधरी उपस्थित होते.