अर्जुनी-मोर. -होळी हा रंग, प्रेम आणि वसंत ऋतूचा लोकप्रिय आणि महत्त्वाचा हिंदू सण आहे. वाईटावर चांगल्या विजयाचे प्रतीक म्हणून होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदनाचा सण साजरा केला जातो.ढोल-ताशाचे युवा पथक डिजेच्या तालवार नाचून बोजारा मागने मग जमा झालेल्या पैशातून धमाल मस्ती दारू पार्टी जेवण अथवा ईतर गोष्टी केल्या जातात मात्र या परंपरेला फाटा देत तालुक्यातील बोंडगांव/ सुरबन येथील गरीब फॉऊडेशन युवा संघटनेने नुकत्याच शिमगा उत्सवात बोजारारूपी जमा झालेला पैशा स्थानिक गोर गरीब सामान्य नागरिकांच्या मुलांसाठी पूर्व प्राथमिक ( कॉन्व्हेंट ) शिक्षणाची सोय व्हावी यासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला. गरीब फॉऊडेशन युवा संघटनेने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
गावात स्थानिक जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत एक ते सात वर्ग आहेत. इथूनच शिक्षण पूर्ण केलेले माजी विद्यार्थी हे विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.या माजी विद्यार्थ्यांच्या कल्पनेने गरीब फाउंडेशन निर्माण करण्यात आले.गावातील शिक्षणाचा स्तर उंचावा सामान्यातल्या सामान्य माणसांच्याही लेकराला गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शाळेतीलच एका वर्ग खोलीत पूर्व प्राथमिक वर्ग सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याला ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच तथा सदस्यांनी दुजोरा देत आर्थिक पाठबळ देण्याचे मान्य केले. शाळा व्यवस्थापन समितीनेही यासाठी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली आहे.त्यामुळे येत्या सत्रात अगदी शुल्लक मासिक वर्गणीत वर्ग सुरू होणार असल्याने पात्र विद्यार्थ्याचे पालक व गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
“ शिमगोत्सवातून गावकऱ्यांनी गरीब फाउंडेशनला दिलेला जवळपास २५ हजार रुपये बोजारा जेवण दारू पार्टी ईतर ठिकाणी वायफळ खर्च न करता शैक्षणिक कामासाठी खर्च करण्याचा निश्चय केला. वर्तमान जीवनात युवकांमध्ये वाढलेले व्यसनाचे प्रमाण त्यातही होळी आणि शिमग्याच्या उत्सवात दारू आहारी गेलेला तरुण सर्वत्र दिसून येतो. या परंपरेला फाटा देत बोंडगाव सूरबन येथील युवकांनी पूर्व प्राथमिक वर्ग सुरू करण्याची केलेली धडपड निश्चितच कौतुकास्पद आहे.