माझी वसुंधरासाठी सिरेगावबांध झाले सज्ज

0
64

अर्जुनी-मोर. -तालुक्यातील सिरेगावबांध ग्रामपंचायत ने स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. माजी वसुंधरा उपक्रमांतर्गत हिरवाईचा नटलेला साज आणि पंचतत्त्वांचा समतोल राखण्यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.
ग्रामपंचायतीने माजी वसुंधरा अभियानासाठी संकल्प बद्ध होऊन विविध उपक्रम हाती घेतले आहे. फुलझाडे, फळझाडे, औषधी वनस्पती,प्लास्टिक मुक्त गाव जलसंधारण स्वच्छतेवर भर देणारे उपक्रम राबवली जात आहेत. जंगल संवर्धनासाठी कुराडबंदी जैविक खत निर्मिती ऊर्जा बचत कार्बन उत्सर्जन कमी करणे यासारख्या अनेक बाबीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे यंदाच्या माजी वसुंधरा पुरस्कारासाठी गावाने शासन निर्धारित निकष पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे ग्रामस्थ तन-मन-धनाने या हरित अभियानात आपले योगदान देत आहेत.
* हरित ग्राम करण्याचा संकल्प
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या आदर्श व हरित ग्राम सेरेगाव बांध ग्रामपंचायत ने गावाशेजारील जंगलात कुराडबंदी करून नैसर्गिक झाडाचे संरक्षण व संवर्धन करण्यात आले आहे ग्रामपंचायतीने आतापर्यंत 7000 बांबू 500 शेवगा दोन हजार आंबा व तीन हजार पाचशे विविध प्रकारचे झाडे लावून त्यांचे संवर्धन केले आहे. स्वतःची रोपवाटिका तयार करून 3000 रोपटी वाढविली आहे गावाच्या दर्शनी भागात हिरवागार बगीचा तयार करून त्यांची देखभाल केली जाते सानगडी – नवेगाव बांध मुख्य रस्त्याच्या कडेला असलेला हा बगीचा येणाऱ्या जाणाऱ्यांचे विशेष आकर्षण ठरत आहे.
ग्रामस्थांचा लोकसहभाग
ग्रामस्थ गावाबाहेर शेतशिवारात घराशेजारी शाळा आणि मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करीत आहेत. झाडांना पाणी आणि सेंद्रिय खत देऊन त्यांचे संगोपन केले जात आहे. सीटबाल तंत्राने जंगल विस्ताराच्या उपक्रमाला गती देण्यात येत आहे.
पर्यावरणपूरक विविध उपक्रम
ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने गावात फटाका बंदी, प्रदर्शन मुक्त सण उत्सव, प्लॅस्टिक बंदी, कचरा वर्गीकरण ,सेंद्रिय शेती, जलसंवर्धन, वीज बचत, आणि सौर ऊर्जेचा वापर या संकल्पनावर जनजागृती केली जात आहे. ग्रामस्थांना जागृत करण्यासाठी नियमित सभा मार्गदर्शन कार्यक्रम आणि कार्यशाळांचे आयोजन केले जाते. गावात नेट कार्बन विसर्जन, जैविक खत निर्मिती, गांडूळ खत, दशपर्णी अर्क, आणि जीवनामृत तयार करण्याचे उपक्रम यशस्वीपणे राबविले जाते आहे. सीडबाॅल तंत्राच्या मदतीने जंगल क्षेत्र वाढवण्याचा अभिनव प्रयोग केला जात आहे.
पुरस्काराची परंपरा
सिरेगावबांध ग्रामपंचायतला आतापर्यंत निर्मल ग्राम, पर्यावरण संतुलित ग्राम, महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम, स्मार्ट ग्राम, बाल स्नेही ग्राम, पंडित दिन दयाल उपाध्याय पंचायत सशक्तिकरण पुरस्कार यासारख्या अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले आहे. तसेच ग्राम स्वच्छता अभियानाचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार देखील मिळाला आहे. माजी वसुंधरा अभियानासाठी अपेक्षित पुरस्कार अध्याप मिळालेला नाही. याची ग्रामस्थांना खंत आहे. त्यामुळे यंदा या पुरस्कारासाठी प्रयत्नाची शिकस्त करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.
आम्ही केवळ पुरस्कारासाठी नव्हे तर पर्यावरण रक्षणासाठी कटिबद्ध आहोत वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे आम्ही निसर्ग संवर्धनाचा ध्यास घेतला आहे. सिरेगावबांध ग्रामपंचायत चे या दिशेने सुरू असलेले प्रयत्न निश्चितच महाराष्ट्रातील इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरतील = हेमकृष्ण संग्रामे उपसरपंच सिरेगावबांध