गुढरी येथे अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन
अर्जुनी-मोर.-अक्षर ओळख,उत्तम पोषकआहार,शिक्षणाची सुरवात,बालकांचे आरोग्य,संस्कार, याची सुरवातच गावागावातील चिमुकल्यांना अंगणवाडी केंद्रातुनच होत असते.बालकांचा शिक्षणाचा पाया सुध्दा अंगणवाडी केंद्र असतो.त्यामुळे अंगणवाडी ईमारत ही सुसज्ज असली पाहीजे त्यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत. नवेगावबांध जि.प.क्षेत्रांतर्गत संपुर्ण गावातील अंगणवाडी केंद्र दर्जेदार असावे असे आपले प्रामाणिक प्रयत्न असल्याचे प्रतिपादन या क्षेत्राच्या जि.प.सदस्य रचनाताई गहाणे यांनी व्यक्त केले.
नवेगावबांध जि.प.क्षेत्रांतर्गत येत असलेल्या मौजा गुढरी येथे नविन अंगणवाडी ईमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी ( ता.21 ) आयोजीत कार्यक्रमात भुमिपुजक रचनाताई गहाणे बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच विवेक डोंगरे होते,अतिथी म्हणुन पंचायत समिती सदस्य पुष्पलताताई दृगकर, उपसरपंच सुवर्णाताई सरोते, संजय हेमणे,किरणताई रामटेके,कल्याणी बन्सोड,दर्शन दिरपुडे,ॠतिका बहेकार,एस.जी.सोनवाने, सत्यजीत रामटेके,हेमराज फुंडे,व ग्रामवासी प्रामुख्याने उपस्थित होते.
13 वा वित्त आयोग व जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मौजा गुढरी येथे जि.प.सदस्या रचनाताई गहाणे यांचे प्रयत्नाने 11 लाख 25 हजार रुपये निधी नविन अंगणवाडी इमारत बांधकामासाठी मंजुर करण्यात आला असुन सदर बांधकामाचे भूमिपूजन रचनाताई गहाणे यांचे हस्ते करण्यात आले आहे.