कृषी महोत्सवात वेळेआधीच सीईओंचे लाडके स्टाॅल बंद करुन बेपत्ता

0
780

गोंदिया,दि.२१:-  कृषी विभाग महिला आर्थिक विकास महामंडळ कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने गोंदिया जिल्हा व नवतेजस्विनी कृषी महोत्सव 2025 चे आज उत्साहात उदघाटन करण्यात आले.या महोत्सवात १०० च्यावर स्टाॅल लावण्यात आले.त्यामध्ये शासकीय विभागाचे जवळपास २२ स्टाॅल असून यामध्ये जिल्हा परिषदेसह कृषी विभाग,पोलीस विभाग,पशुसंवर्धन विभागाचा समावेश आहे.या कृषी महोत्सवाचे वेळापत्रक हे सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत असून यावेळेत सर्वच स्टाॅल सुरु राहणे अपेक्षित होते.मात्र गोंदिया जिल्हा परिषदेच्यावतीने लावण्यात आलेल्या संपुर्ण स्वच्छता विभागाचे स्वच्छ भारत मिशन(ग्रामीण)टप्पा-२ चेही स्टाॅल लावण्यात आले होते.या स्टाॅलमध्ये या विभागाचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते,जे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संपुर्ण स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचे लाडके कर्मचारी होते.या लाडक्या कर्मचार्यांनी काहीही केले तरी सीईओ त्यांचीच बाजू नेहमी घेत असल्याने त्याचाच गैरफायदा घेत नवतेजस्विनी कृषी महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सायकांळी ६.३० वाजताच हे स्टाॅल बंद करुन कर्मचारी निघून गेल्याने सायकांळी ६.३० नंतर महोत्सवात भेट द्यायला आलेल्या अनेकांना स्वच्छ भारत मिशनच्या स्टाॅलसह जिल्हा पशुसंवर्धन विभाग,कृषी विज्ञान केंद्र हिवरा,जिल्हा पणन विभाग,आमगाव तालुका कृषी विभागासह जिल्हा परिषदेचे सर्वच स्टाॅल हे वेळेआधीच बंद करुन कर्मचारी निघून गेल्याचे चित्र बघावयास मिळाले.यावरुन कर्मचारी हे फक्त अधिकारी व पदाधिकारी यांच्यासमोर पुढे पुढे होऊन आपल्या चुकावर पांघरुन घालण्यात जसे अग्रसर राहतात तसे मात्र महोत्सवातील वेळ पाळण्यात नसल्याचे दिसून आले.गेल्या अनेक वर्षापासून कृषी महोत्सवातील स्टाॅल हे सायंकाळी ६ नंतर बंद होत असल्याचे दिसून आले.ज्या महिला बचतगटाच्या सदस्या मुक्कामी असतात त्यांचेच स्टाॅल रात्री वेळेपर्यंत सुरु असल्याचेही दिसून आले.मात्र जिल्हाधिकारी असो की मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा कृषी अधिक्षक यांचा आपल्या कर्मचारी वर्गावर वचक नसल्याचे दिसून आले.