बोळदे – बाराभाटी येथे बौध्द विहाराचा उद्घाटन समारंभ सोहळा

0
80

अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील प्रबुध्द पंचशिल बौध्द सामाज बोळदे/बाराभाटीच्या सौजन्याने दिनांक २२ मार्च २०२५ रोज शनिवार ला सकाळी ११ वाजता प्रबुध्द पंचशिल बौध्द विहार बोळदे/बाराभाटीच्या प्रांगणात बौध्द विहाराचा उद्घाटन समारंभ सोहळा पार पडणार आहे आणि सायंकाळी ५ वाजता पासून स्नेहभोजनाला सुरुवात होणार असून त्याचरात्रीला ९ वाजता सावित्रीबाई महिला मंडळ साकोली यांचा भीम बुद्ध गीताचा कार्यक्रम होणार असून तरी या सदर कार्यक्रमाला उपासक, उपासिका व सर्व समाज उपस्थित राहण्याचे आवाहन प्रबुध्द पंचशिल बौध्द सामाज बोळदे/बाराभाटी यांनी केला आहे.

याप्रसंगी ता.२२ मार्च सकाळी ९ वाजता भन्तेजी भंदत नंदथेरो वडसा व भन्तेजी श्रामनेर सुगतबोधी वडसा यांच्या वतीने परित्राणपाठ होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता बौध्द विहाराचा उद्घाटक समारंभ सोहळा पार पडणार आहे यावेळी बौध्द विहाराच्या उद्घाटन समारंभ सोहळ्याचे उद्घाटक यशोधरा रविंद्र शिंदे व रूपलता भीमराव फुले नागपुर, अध्यक्ष माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे विधानसभा क्षेत्र अर्जुनी मोर, उपाध्यक्ष जि.प अध्यक्ष लायकराम भेंडारकर गोंदिया, सहउद्घाटक नगरसेवक दानेश साखरे अर्जुनी मोर, माँ फाउंडेशन डायरेक्टर ताराचंद साऊस्कार, वन्यजीव मार्गदर्शक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर दहिकर नागझिरा व जि.प सदस्या कविता अशोक कापगते गोंदिया,
विशेष अतिथी म्हणून सार्व.बां. विभाग इंजि.शैलेश डोंगरे स.अर्जुनी , माजी जि.प उपाध्यक्ष यशवंत गणवीर गोंदिया, पं.स सदस्या शालिनी डोंगरवार अर्जुनी मोर, रा.काँ.पा अध्यक्ष किशोर तरोणे अर्जुनी मोर, शुभम गोस्वामी नागपुर, राष्ट्रीय अध्यक्ष संविधान सेना दिलवरभाई रामटेके, संचालक आ.सोसायटी व्यकट खोब्रागडे बाराभाटी आदी उपस्थित राहणार असून तसेच प्रमुख अतिथी म्हणून ग्रामसेवक एम. एम खडके सुकळी, उपसरपंच ओमप्रकाश मेळे सुकळी, रोजगार सेवक विरेश चव्हाण, कर्मचारी मच्छिद्र उजवणे सुकळी, ग्रा.पं सदस्य ताम्रध्वज गावराणे सुकळी, ग्रा.पं सदस्या मनिषा शहारे सुकळी, ग्रा.पं सदस्या भाग्यश्री नरवास सुकळी, ग्रा.पं सदस्या नंदा घरतकर सुकळी, पं.वि.मुख्या व्ही.एम चव्हाण बाराभाटी आदी उपस्थित राहणार आहेत.यावेळी सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने जमीनदाते म्हणून बुद्धवासी वच्छला ऋषी जांगळे आणि यशोधरा शिंदे नागपुर, खुशाल चिमणकर, डिलक्स सुखदेवे, रोहित हुमने या सत्कारमुर्तीचे सत्कार होणार आहे.
सदर कार्यक्रमाच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष शैलेश रामटेके, उपाध्यक्ष प्रशांत मेश्राम, सचिव रोहित हुमणे, सहसचिव निखिल चिमणकर, कोषाध्यक्ष प्रांजल चिमणकर आदी सदस्य आहेत.यासंपूर्ण कार्यक्रमाचे संचालक धम्मदिप मेश्राम करणार आहेत.