भंडारा -: देशाचे स्वातंत्र्य आणि समाजवादासाठी हसत हसत मृत्यूला कवटाळणाऱ्या क्रांतिवीर, देशप्रेमी, अमर शहीद भगतसिंग व त्यांचे सहकारी शहिद सुखदेव व शहीद राजगुरू यांच्या 94 व्या स्मृती दिना प्रित्यर्थ दिनांक 23 मार्च 2025 रविवारला दुपारी दोन वाजता राणा भवन भंडारा येथे बलिदान दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
समारंभाचे आयोजन भारतीय कम्युनिस्ट पक्ष व ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने केला असून *शहीद भगतसिंगाच्या स्वप्नातील भारत-काळाची गरज* तसेच *स्थानिक प्रश्न*- ज्यात रस्ते, पाणी, स्वच्छता, घरकुल, पट्टे, वीज, निराधार, पेन्शन, आरोग्य, शिक्षण इत्यादी विषयावर भाकपचे जिल्हा सचिव व दलित अधिकार आंदोलनाचे राज्य सहसचिव कॉम्रेड *हिवराज उके*, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे राज्याध्यक्ष कॉम्रेड *वैभव चोपकर*, ओबीसी जनगणना परिषदेचे अध्यक्ष कॉम्रेड *सदानंद इलमे* व महिला फेडरेशनच्या कार्यकर्त्या कॉम्रेड *प्रियकला मेश्राम* यांचे प्रमुख मार्गदर्शन होईल.
करिता नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन कॉम्रेड गजानन पाचे, कॉम्रेड भगवान मेश्राम, कॉम्रेड ताराचंद देशमुख, कॉम्रेड गौतम भोयर, कॉम्रेड शीतल नागदेवे तसेच कॉम्रेड रवी बावणे, कॉम्रेड विश्वजीत बनकर, कॉम्रेड मनोकामना भौतिक, कॉम्रेड सायली झंजाळे, कॉम्रेड दामिनी नंदेश्वर, कॉम्रेड आपताब, कॉम्रेड हरिदास जांगडे, कॉम्रेड राजू लांजेवार, कॉम्रेड दीपक गजभिये, कॉम्रेड सीमा फुले, कॉम्रेड वैशाली सांगोळे, कॉम्रेड कविता कुंभलकर, कॉम्रेड गीता मेश्राम, कॉम्रेड भारती मेश्राम, कॉम्रेड ममता तुरकर, कॉम्रेड महानंदा गजभिये, कामरेड उर्मिला वासनिक, कॉम्रेड ज्ञानेश्वर मानवटकर, कॉम्रेड पूजा आस्तिक नंदागवळी, कॉम्रेड किशोर मेश्राम कॉम्रेड प्रताप डोंगरे, कॉम्रेड प्रितेश धारगावे इत्यादींनी केले आहे.